43.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राजकीय राजेंद्र जैन यांच्या आईला “आपके दो दो बेटे खासदार बन गये..” म्हणत...

राजेंद्र जैन यांच्या आईला “आपके दो दो बेटे खासदार बन गये..” म्हणत वर्षा पटेलांनी व्यक्त केला आनंद

0
89

blank

गोंदिया- राजेंद्र जैन यांची राज्यसभेसाठी निवड झाल्यानंतर राजकीय वर्तुळात सुनील तटकरे आणि प्रफुल पटकरे या जोडगोळीच्या अजूनही कायम असलेल्या वर्चस्वाची चर्चा रंगली आहे. तर राजेंद्र जैन यांची राज्यसभेसाठी निवड झाल्यानंतर त्यांच्या राहत्या घरीही आनंदाच वातावरण असून आनंद व्यक्त केला जात आहे.
blank
‘माताजी आपके दो-दो बेटे खासदार बन गये’ असं म्हणत प्रफुल पटेल यांच्या पत्नी वर्षा पटेल यांनी राजेंद्र जैन यांच्या आईला या संदर्भात गोड बातमी दिली आहे.राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर गोंदियात जल्लोष करण्यात येत असून वर्षा पटेल यांनी जैन कुटुंबीयांची भेट घेतली.राष्ट्रवादीकडून राज्यसभेची उमेदवारी प्रफुल पटेल यांचे निकटवर्ती असलेले राजेंद्र जैन यांना देण्यात आली त्यानंतर प्रफुल पटेल यांच्या पत्नी वर्षा पटेल यांनी राजेंद्र यांच्या घरी भेट देत राजेंद्र जैन यांच्या आईला “आपके दो दो बेटे खासदार बन गये..” म्हणत आनंद व्यक्त केला.

blank