29.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता गणखैरा येथील चोरी प्रकरणातील आरोपींना पोलिसांचे अभय!

गणखैरा येथील चोरी प्रकरणातील आरोपींना पोलिसांचे अभय!

0
334

blank

गोंदिया – गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्या अंतर्गत येत असलेल्या गोरेगाव तालुक्यातील गणखैरा येथील ट्रॅक्टर बॅटरी चोरी प्रकरणातील आरोपींवर कोणतीच कारवाई न केल्याने आरोपींना पोलिसांचे अभय असल्याचे बोलले जात असून गावांत पोलिसांविरोधात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गणखैरा येथील फिर्यादी रविंद्र चुन्नीलाल पारधी यांच्या मालकीचे ट्रॅक्टर आहे. नेहमीप्रमाणे 24 सप्टेंबर 2020 रोजी शेतीचे कामे आटोपून त्यांनी आपले ट्रॅक्टर आपल्या घरातील आवारात आणून ठेवले होते. दुसर्‍या दिवशी 25 सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे पहाटे 5 वाजता उठून गोठ्यातील जनावरे बाहेर काढत असताना त्यांची नजर ट्रॅक्टर कडे गेली असता 6 हजार 600 रुपये किमतीचे बॅटरी चोरी गेल्याचे निदर्शनास आले. लगेच त्यांनी आपल्या भावाला या संबंधात माहिती दिली व दोघेही मोटरसायकलने चोरास शोधण्यासाठी निघाले असता आरोपी एक इसम गणखैरा कडून पूरगावकडे प्लास्टिक बोरी मध्ये बॅटरी घेऊन जात असल्याचे दिसले. लगेच त्याला थांबवून त्याची झडती घेतली असता त्यांना बॅटरी आढळून आली. यासंबंधी फिर्यादी यांनी गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपी दाणी यांच्या विरोधात भादंवि कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र त्याच्यावर कोणतीही कारवाई न करता आरोपींना सोडून देण्यात आले. दुसर्‍या दिवशी गावांत येऊन आरोपींनी आपले काय झाले, आपले कोणी वाकडे करू शकत नाही या आविर्भावात वावरत असल्याने फिर्यादीसह गावातील नागरिकां मध्ये पोलिसां विरोधात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले.

blank