
गडचिरोली,दि.09 : जिल्हयात आज 125 नवीन कोरोना बाधित आढळून आले तसेच एकुण सक्रिय बाधितांमधील आज 89 जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे जिल्ह्यातील एकुण सक्रिय कोरोना बाधितांचा आकडा 957 झाला. तर आत्तापर्यंतची एकुण कोरोना बाधित संख्या 3743 वर पोहचली आहे. यापैकी 2765 जणांनी कोरोनावर मातही केली आहे. एकुण आत्तापर्यंत जिल्हयात 21 मृत्यूंची नोंद झाली आहे. यानुसार जिल्हयात सद्या रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 73.87 टक्के आहे. सक्रिय रूग्णांची टक्केवारी 25.57 असून मृत्यूदर 0.56 टक्के आहे.
आज नवीन 125 बाधितांमध्ये गडचिरोली 56, अहेरी 5, आरमोरी 23, भामरागड 2, चामोर्शी 4, धानोरा 6, एटापल्ली 18, कुरखेडा 02, सिरोंचा 4 व वडसा येथील 5 जणांचा समावेश आहे. तसेच आजच्या 89 कोरोनामुक्त रूग्णांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 18, अहेरी 9, आरमोरी 6, भामरागड 2, चामोर्शी 7, धानोरा 11, एटापल्ली 22, मुलचेरा 2, कोरची 3, कुरखेडा 2 व वडसा येथील 7 जणांचा समावेश आहे.
नवीन बाधितांमध्ये गडचिरोलीतील 56 बाधितांमध्ये दुसऱ्या जिल्हयातील 6, पोलीस स्टेशन गडचिरेाली 1, चामोर्शी रोड 1, नवेगाव 1, मथुरा नगर आयटीआय बायपास 1, मुरखाळा 1, रामनगर 4, बेलगाव 1, सदगुरु नगर 2, विवेकनंद नगर 1, गोकुळनगर 1, 192 बटालियन सीआरपीएफ 6, लांजेडा 2, सर्वोदय वार्ड 2, साई नगर 1, सुभाष वार्ड तलाव रोड 1, एट पो. तहसील अहेरी 1, कलेक्टर कॉलोनी 1, मेडीकल कॉलनी 1, मुरखळा 4, अयोध्यानगर 2, शिवाजी ग्रंथालयाच्या मागे 4, कन्नमवार वार्ड 1, गडचिरोली शहरातील इतर 10 यांचा समोवश आहे. आरमोरी तालुक्यातील 23 बाधितामध्ये आरमोरी शहर 20, मनापूर 1, वसाळा 2 जणांचा समावेश आहे. वडसा तालुक्यातील 5 बाधितांमध्ये कोकडी 2, गौरनगर 1 (दुसऱ्या जिल्ह्यातील), गांधी वार्ड 1, तुकुम वार्ड 1 यांचा समावेश आहे. धानोरा तालुक्यातील 6 बाधितांमध्ये धानोरा शहर 2, चातगाव 1, जपतलाई 3 जणांचा समावेश आहे. भामरागड तालुक्यातील 2 बाधिताध्ये भामरागड शहरातील 2 आहेत. कुरखेडा तालुक्यातील 2 बाधितामध्ये तलेगाव 1, पुराडा पोलीस स्टेशन 1 जण आहे. अहेरी तालुक्यातील 5 बाधितामध्ये अहेरी शहरातील 4, आलापल्ली 1 जणाचा समावेश आहे. एटापल्ली तालुक्यातील 18 बाधितांमध्ये एटापल्ली शहरातील 9, एटापल्ली पोलीस 3, सीआरपीएफ 3, हेडरी 3 जणांचा समावेश आहे. चामोर्शी तालुक्यातील 4 बाधितांमध्ये हनुमान नगर 1, मुरखडा चाक 1, घोट 2 जणांचा समावेश आहे. सिरोंचा तालुक्यातील 4 बाधितांमध्ये सिरोंचा शहरातील 4 जणांचा समावेश आहे.





