
विनोद सुरसावंत/ककोडी (देवरी) – देवरी तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भाग असलेल्या ककोडी परिसरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा विखुरला गेल्याने पर्यावरणासह आरोग्य धोक्यात आले आहे.ककोडी ते बंजारी ,ककोडी, आटरा रोड, ककोडी धोबाटोला टिपानगड़ रोडवर आणि त्यास लागून असलेल्या शेती आणि झुडपी जगंल परिसरात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक पिशव्या, पाण्याचे ग्लास, बाटल्या फेकल्या जात असून ते पावसाच्या पाण्यासोबत शेतात तसेच तलावात वाहुन जात आहेत. त्यामुळे शेतकर्यांना शेतीसाठी त्रास होत आहे.तसेच प्लास्टिक पिशव्या तलावात वाहुन जात असल्याने पाणी प्रदूषित होत आहे. तसेच जनावरे ह्या पिशव्या खाल्याने त्याना गंभीर बिमारी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.