आषाढी एकादशी च्या मुहूर्तावर विवीध विकासात्मक कामाचे उद्घाटन

0
103

*जि.प.सदस्य किरण पारधी यांचा पुढाकार
चित्रा कापसे
तिरोडा–तालुक्यातील मिनी पंढरपूर समजल्या जाणाऱ्या बेलाटी बु.येथे आषाढी एकादशी निमित्ताने जिल्हा परिषद सदस्य किरण पारधी यांनी श्री विठ्ठलरुक्माईची पूजा अर्चना करून अनेक विकास कामाचे भूमिपूजन केले.

भूमिपूजनाचे उद्घाटन टिकास मारून जि प सदस्य किरण पारधी, प.स. सदस्य पिंटू चौधरी, गावातील सरपंच सौ. स्वातीबाई चौधरी, उपसरपंच मोरेश्वर आगाशे, सर्व ग्रामपंचायत सदस्य गावकरी बांधव, शाळेतील सर्व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे सर्व सदस्य अध्यक्ष उपस्थित होते.
या विविध कामांचे भूमिपूजनात जिल्हा परिषद पंधरावे वित्त निधीतून बंदिस्त नाली बांधकाम ५ लाख रुपये, आरो प्लांटचा लोकार्पण (खासदार सुनील मेढे यांच्या प्रयत्नातून) पंचायत समिती निधीतून शौचालय दुरुस्तीचे काम, वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन मोरेश्वर आगाशे व आभार प्रदर्शन पिंटू चौधरी यांनी केले
याप्रसंगी गाव सदैव सुख शांती समाधानाने व समृद्धीने पूर्ण रहावे म्हणून विठ्ठल रुक्मिणी च्या चरणी गावातील सरपंच उपसरपंच यांनी साकडे घातले.