खासदार पटेलांची तिरोड्यातील रविकांत बोपचेंच्या राँका जनसंर्पक कार्यालयाला भेट

0
327

तिरोडा,दि.19ः- राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते व राज्यसभा खासदार प्रफुलभाई पटेल यांनी(दि.१८)रविवारला आपल्या तिरोडा दौर्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रविकांत (गुड्डू) खुशाल बोपचे यांच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेंट देत चर्चा केली.यावेळी माजी खासदार खुशाल बोपचे,माजी आमदार राजेंद्र जैन प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी मतदारसंघातील नागरिकांच्यावतीने कार्यालयाला प्राप्त झालेल्या निवेदनाच्या अभ्यासानंतर काही मागण्यांचे निवेदन रविकांत बोपचे यांनी खासदार पटेल यांना सादर केले.त्या निवेदनात तिरोड़ा नगरपरिषद अंतर्गत नविन अंगणवाडीना मंजुरी मिळणे.रमाई आवास,प्रधानमंत्री आवास,शबरी आवास योजने अंतर्गत सन २०१८-१९ व २०१९-२० मधील मंजूर लाभार्थ्यांचा हिस्सा निधी मंजूर करणे.तहसिलकार्यालयात रेशन कार्डची (कोरे) सोय उपलब्ध करून देणे.आवास योजनेच्या लाभार्थ्यासाठी शासकीय दरात रेती उपलब्ध करून देणे.उपविभागीय कार्यालय तिरोडा येथे पूर्णकालीन उपविभागीय अधिकारीची नियुक्ती करणे.पुरामुळे जीर्ण झालेले घर ज्यांचे नाव प्रधानमंत्री आवास योजनेच्या पपत्र “ड” मध्ये आहेत त्यांना त्वरित आवास मंजूर मिळण्यासह इतर मागण्यांचा समावेश होता.त्यासोबच मतदारसंघातील पक्ष संघटन व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीवर चर्चा करण्यात आली.
यावेळी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन,युवा नेता रविकांत (गुड्डू) बोपचे, जिल्हाध्यक्ष महिला आघाडी राजलक्ष्मी तुरकर, सभापती निताबाई रहांगडाले,तालुका अध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले,माजी नगराध्यक्ष तथा नगरपरिषद सदस्य अजय गौर,सर्वश्री जि.प.सदस्य कैलाश पटले,मनोज डोंगरे ,सुनिता मडावी,पं.स.सदस्य नत्थुभाऊ अंबुले,किशोर पारधी,मायाबाई शरणागत ,तुन्डीलाल शरणागत तसेच डोंबळे काका,किरण बन्सोड,जगदीश कटरे,बाळूभाऊ येरपुडे ,विजय बुरडे,राहुल गहेलवार,किरण पारधी,जगदीश (बालू) बावनथडे,भावानिसिंग बैस,नंदकिशोर शरणागत,सोनू भगत आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.