गोंदिया,दि.19ः देवरी पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या सडक अर्जुनी तालुक्यातील कोयलारी गावामध्ये एक इसम अवैधरित्या गांजा बाळगून असल्याची गुप्त माहिती पोलीस विभागाला मिळताच पोलीस अधिक्षक विश्व पानसरे व अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात(१८ ऑक्टोबर)देवरी पोलीसांच्या चमूने धाड घालून 20 हजार रुपयाचा गांजा हस्तगत केला.गांजा बाळगल्याप्रकरणी 50 वर्षीय इसम हिरालाल तुकाराम मेश्राम यास ताब्यात घेण्यात आले.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोयलारी गावात एक इसम सर्रासपणे अवैधरीत्या गांजा बाळगून विक्री करीत असल्याची माहिती मिळताच वरिष्ठांच्या आदेशानुसार देवरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित कदम,अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालयाचे वाचक विजयकुमार धुमाळ,हवालदार कगांली,पोलीस नायक राऊत,देसाई,पोलीस शिपाई बोपचे यांच्या चमूने कोयलारी येथील हिरालाल तुकाराम मेश्राम(वय ५०)यांच्या घरी जाऊन घराच्या समोरील शेतातील आंब्याच्या झाडाजवळील बांधीत पाहणी केली.त्यावेळी धान पिकाच्या बांधीत एका कोपऱ्यात पिवळ्या प्लास्टिक मध्ये सुतळीने गुंडाळलेले पोतळी आढळून आली.सदर पोतळी बाहेर काढून पाहणी केली असता त्यात वाळलेला गांज्या सदृश्य हिरवट काळपट रंगाचा उग्रवासाच्या काड्या, पत्ते व चुरा असलेला किंचित नरम पणा असलेला पदार्थ मिळून आला. त्या पदार्थाची वास घेऊन खात्री केली असता गांजा असल्याचे खात्री झाल्याने मापारीकडून प्लास्टिक पिशवीसह वजन केले असता त्यात २.५४० कि.ग्राॅम अंदाजे सुमारे २०४००/- रुपयांचे माल मिळून आला.सदर माल जप्त करुन मुद्देमाल व आरोपी हिरालाल तुकाराम मेश्राम यास ताब्यात घेतले आहे.