मुंबई,दि.24 : भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सोडचिठ्ठि देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशानंतर भाजप समर्थक मीरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी आज शिवसेना पक्षात प्रवेश केला.राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे,बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे,युवासेना अध्यक्ष व मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. त्या भाईंदरच्या माजी महापौर आणि भाजपनेत्या आहेत. विधानसभा निवडणूकीत गीता यांचे विरोधक मानले जाणाऱ्या नरेंद्र मेहता यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली होती. नरेंद्र मेहता हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवस यांचे जवळचे मानले जातात. त्यामुळे गीता जैन यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली आणि त्यांनी मेहतांचा पराभव केला होता.एक वर्षाआधी त्यांनी भाजपचा पराभव आजच्याच दिवशी केला होता.त्यानंतर आजच त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला.





