28.9 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home राजकीय नवनिर्वाचित खासदार राजेंद्र जैन यांचा सडक/अर्जुनी येथे सत्कार

नवनिर्वाचित खासदार राजेंद्र जैन यांचा सडक/अर्जुनी येथे सत्कार

0
51

सडक अर्जुनी,दि.१६- राज्यसभेवर बिनविरोध खासदार म्हणून निवड झाल्यानंतर प्रथमच सडक/अर्जुनी येथील आगमनानिमित्त आमदार राजकुमार बडोले यांच्या निवासस्थानी पदाधिकारी व कार्यकत्यांकडून नवनिर्वाचित खासदार राजेंद्र जैन यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील संसदीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या प्रदीर्घ राजकीय, सामाजिक व लोकहिताच्या कार्याला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्यात.

यावेळी आमदार राजकुमारजी बडोले. सौ शारदाताई बडोले, श्री प्रशांत शहारे, डॉक्टर अविनाश काशीवार, श्री किशोर तरोणे, श्री लोकपाल गहाणे, श्री शिवाजी गहाणे, सौ रजनी गिरीपुंजे, सौ वंदनाताई डोंगरवार, श्रीमती कामिनी कोवे, डॉक्टर महेश गिरी गुंजे, सौ.रिता लांजेवार, सुभाष कापगते, श्री रमेश चुर्हे, श्री झिंगरे माजी पोलीस पाटील श्री मुनेश्वर कापगते, अतुल फुले, सचिन गहाणे, श्री जांभुळकर, श्री हातझाडे, श्री सुशील लाडे, श्री यावलकर, श्री युवराज वालदे, श्री आकाश गुप्ता, श्री निप्पल बरेया, श्री उमेश कापगते, श्री रतन डोंगरवार, आनंदा निखारे, वैशाली गिरीपुंजे, अशोक लांजेवार व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

blank