
मोहाडी,दि.28(नितिन लिल्हारे) :- या वर्षी कोरोनाचे संकट नंतर महापूर व आता धान पिकांवर मावा तुडतुड्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना शेतकरी संकटात सापडला आहे.त्यामुळे या वर्षी शेतकऱ्यांना उन्हाळी धानपिकासाठी बावंनथडी प्रकल्पाचे पाणी नेरला (सालई खुर्द) कालवा क्रमांक २ ला देण्यात यावे.या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले त्यावेळी प्रशासनातर्फे लिखीत आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले गेले होते. परंतु आश्वासनाची पूर्तता न केल्याने पुन्हा आज २८ ऑंक्टोबर बुधवारला सकाळी १० वाजता रामटेक-तुमसर राज्यमार्गावर सालई खुर्द येथे उसर्रा, सालई खुर्द, टांगा, पालडोंगरी, सिहरी, बपेरा, नेरला, रामपूर गावातील शेतकऱ्यांकडुन रास्ता रोको आंदोलनास सुरवात केली.आंदोलन दरम्यान तुमसरचे उपविभागीय अधिकारी, आंधळगावचे ठाणेदार दिपक वानखेडे, तुमसरचे ठाणेदार रामेश्वर पिपरेवार यांनी आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला तसेच परिसर आपल्या ताब्यात घेतला.आंदोलनकर्त्याना आमदार राजू कारेमोरे, माजी आमदार अनिल बावनकर व सर्व पक्षीय लोकांनी भेट देत चर्चा केली.आमदार राजू कारेमोरे यांनी मध्यस्थी काढण्याचा मार्ग काढला. त्यादरम्यान मात्र बावंनथडी पाटबंधारे विभागाचे अधिकारी सिंग आंदोलनस्थळी उपस्थित होत्या.आमदार कारेमोरे यांनी जिल्हाधिकारी बरोबर दोन दिवसात बैठक करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी शेतकऱ्यांना दिल्यानंतरर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतला.असे असले तरी शेतकऱ्यांचा लढा सुरूच राहील अशा इशारा अशोक पटले, नितीन लिल्हारे, प्यारेलाल दमाहे, डॉ सुनील चवळे, सुभाष गायधने, हैशोक शरणागत, मूलचंद पटले, भोलाराम पारधी, प्रकाश खराबे, रामू बघेले, नंदलाल लिल्हारे, ईश्वरद्याल गिरीपुंजे, श्रीकांत बन्सोड, शैलेश लिल्हारे, झनकलाल दमाहे, तुळशी मोहतुरे, दुर्गाप्रसाद बघेले, भूषण ठाकरे,चंदन लिल्हारे, शिवदास दमाहे, प्रदीप बंधाटे, गणेश दमाहे, शिवदास लिल्हारे,ईश्वर बोन्द्रे, रामद्याल नागपुरे आदी शेतकऱ्यांनी दिला आहे.
______________________________ _
बावंनथडी कार्यकारी अभियंता व पाटबंधारे विभागांनी शेतकऱ्यांना बजावलेले नोटीस “महाराष्ट्र सिंचन कायदा 1976” नुसार बेकायदेशीर आहे. ट्रान्झिट लॉसेस, वास्तविक लागवड नियोजन करण्याचे सोडून “फोडा आणि झोडा” नीतीचा वापर करून शेतकऱ्यांत भांडणे लावीत आहेत. तरी शेतकरी बांधवांनी या धोरणाला बळी पडू नये.प्रकल्पाच्या पाण्याचा पुरेपूर वापर करून जास्तीत जास्त लागवड क्षेत्र कसे वाढवता येईल व पाण्याचा अपव्यय कसे टाळता येईल! यावर भर द्यावा.
प्रा.डॉ. सुनिल चवळे