
अर्जुनी-मोर,दि.30ः सहकारी शेतकरी खरेदी विक्री अर्जुनी-मोर येथील व्यापार संकुलाचे लोकार्पण माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी खरेदी विक्रीचे सभापती नामदेव कापगते,उपसभापती केवळराम पुस्तोडे,भाजप तालुकाध्यक्ष अरविंद शिवणकर,संचालक रघुनाथ लांजेवार,चामेश्वर गहाणे,भोजराज लोगडे,लैलेश्वर शिवणकर,लालदास शहारे,होमराज ठाकरे,रामचंद्र देशमुख,कुसन झोळे,तानेश ताराम,नंदकुमार गहाणे,पंढरी लोगडे,दामोधर नाकाडे,रतीराम कापगते,कलाबाई नाकाडे,खरेदी विक्रीचे व्यवस्थापक गंथडे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी माजी मंत्री राजकुमार बडोले यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.