गडचिरोली 115 नवीन बाधित, तर 97 कोरोनामुक्त

0
123

गडचिरोली,दि.30: आज जिल्हयात 115 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 97 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 5766 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 4806 वर पोहचली. तसेच सद्या 903 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 57 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.35 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 15.66 टक्के तर मृत्यू दर 0.99 टक्के झाला.

नवीन 115 बाधितांमध्ये गडचिरोली 38, अहेरी 16, आरमोरी 5, भामरागड 25, चामोर्शी 3, धानोरा 0, एटापल्ली 3, कोरची 3, कुरखेडा 5, मुलचेरा 1, सिरोंचा 1 व वडसा येथील 15 जणाचा समावेश आहे.

आज कोरोनामुक्त झालेल्या 97 रूग्णांमध्ये गडचिरोली 38, अहेरी 1, आरमोरी 13, भामरागड 2, चामोर्शी 6, धानोरा 10, एटापल्ली 5, मुलचेरा 4, सिरोंचा 1, कोरची 8, कुरखेडा 6 व वडसा मधील 3 जणांचा समावेश आहे.

नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये इतर जिल्हयातील 3, शहरातील इतर 10, रामनगर 1, आरमोरी रोड 2, गोकूळनगर 1, नवेगाव पेट्रोल पंप जवळ 1, सोनापूर कॉ. 2, कॅम्प एरिया 3, धुंडे शिवणी 1, गांधी वार्ड 1, गुरवडा 1, आयटीआय चौक 1, नवेगाव कॉ. 1, पोलीस कॉलनी 1, रामपुरी वार्ड 1, रेव्हून्यू कॉलनी 2, साईनगर 1, सर्वोदय वार्ड 1, टी पाँईंट 3 जणांचा समावेश आहे. आहेरीमध्ये 9 स्थानिक तर आलापल्ली 7 जणांचा समावेश आहे. आरमोरी मध्ये 1 कालागोटा, 2 वैरागड व स्थानिक 2 जणांचा समावेश आहे. भामरागड मधील नारगुंडा पोलीस स्टेशन मधील 18, स्थानिक 5, ताडगाव 1 व 1 इतर जणांचा समावेश आहे. चामोर्शी मधील स्थानिक 1, वाघदरा 1 व घोट येथील 1 जणांचा समावेश आहे. एटापल्ली मधील जांभिया गट्टा 1 व इतर 2 स्थानिक आहेत. कोरची मध्ये टेंबाली 1, गोट्टा टोला 1, कोहकाबोडी 1 जणांचा समावेश आहे. कुरखेडा मध्ये कढोली 1, माळेवाडा 1, नान्नी 2, कुंभीटोला 1 जणांचा समावेश आहे. मुलचेरा मध्ये बोलेपल्ली पोलीस स्टेशन 1 जण आहे. सिरोचा 1 स्थानिक आहे. वडसा मध्ये स्थानिक 6, कन्नमवार वार्ड 1, कस्तूरबा वार्ड 1, गांधी वार्ड 2 व विसोरा एसआरपीएफ 5 जणांचा समावेश आहे.