जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव उभा-खासदार प्रफुल पटेल

0
243

मोहाडी,दि.31ः-चांगल्या पावसामुळे धानपिकाचे उत्पादन चांगले होते,मात्र अवकाळी आलेल्या पावसामुळे यावर्षीही काही प्रमाणात धानपिकाचे नुकसान झाल्याने शेतकर्यावर संकट कोसळले आहे.त्यामुळे शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कधीही मागे फिरलो नाही,उलट सैदव पाठिशी राहिलो असून यावर्षी सुध्दा शेतकर्यांना शासकीय हमीभावासोबतच 700 रुपयाचे बोनस देण्यात येणार असल्याची ग्वाही खासदार प्रफुल पटेल यांनी दिली.ते भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथील वंजारी लाॅन येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकित बोलत होते.यावेळी त्यानी येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी आत्तापासूनच कामाला लागण्याचे निर्देश सर्वांना दिले.

यावेळी राकाँ जिल्हाध्यक्ष नानाभाऊ पंचबुद्धे, आमदार राजूभाऊ कारेमोरे, माजी खासदार मधुकर कुकड़े, माजी आमदार राजेंद्र जैन, प्रदेश सचिव धंनजय दलाल, तुमसर विधानसभा अध्यक्ष विट्टल काहलकर, वासुदेव बांते तालुका अध्यक्ष, नेहाताई शेंडे जिल्हा युवती अध्यक्ष, यशवंतजी सोनकुसरे, केशोराव बांते, रामद्याल पारधी, हरिभाऊ डोये, विजय पारधी, रिताताई हलमारे, यशवंतजी ढबाले, अनिल काळे, मनीषाताई गायधने, श्रीधर हटवार, यमुनाताई राखडे, सदाशिव ढेंगे प्रदीप बुराडे, पुरुषोत्तम पात्रे आनंद मलेवार, भूपेंद्र पवनकर, बाबुराव मते, किरण अतकरी, बबलू सय्यद, खुशाल कोसरे, नरेंद्र पिकलमुंडे, हैशोक शरणागत,सकिल आंबागडे,चेतन ठाकूर, सुमित पाटील, रितेश वासनिक, अरविंद येळणे, गंगाराम सव्वालाखे, बाणा सव्वालाखे, कमलेश कनोजे, झगडू बुधे, महादेव फूसे, महादेव पचघरे, चंदू सेलोकर, नरेश इस्व्कर, कार्तिक ईश्वरकर, महादेव बुरडे, देवाजी पचघरे, दादाराम भोयर, छोटू मिरासे,विजय बारइ, अनिल सोनवाने, अश्विनिताई लेंडे,आकांशाताई वासनिक, कैलास तितीरमारे व मोहाडी तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विजय पारधी यांनी तर प्रास्ताविक वासूभाऊ बांते यांनी केले.आभार खुशाल कोसरे यांनी मानले. इतर पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.त्यात सर्वश्री गौरीशंकर पालांदूरकर भाजप युवा मोर्चा, जीवन दमाहे खमारी बु, हरिदास सहारे खमारी, सुभाष बागडे, जितेंद्र दमाहे खमारी आदिंचा समावेश आहे.