भंडारा जिल्ह्यात आज 101 डिस्चार्ज;77 कोरोना पॉझिटिव्ह

0
232

भंडारा दि. 31 : जिल्ह्यात आज 101 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7402 झाली असून आज 77 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 8519 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.88 टक्के आहे.आज 721 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 77 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 69 हजार 07 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 8519 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.88 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 02.57 टक्के एवढा आहे.

जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 15, मोहाडी 06, तुमसर 05, पवनी 10, लाखनी 13, साकोली 05 व लाखांदुर तालुक्यातील 23 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 7402 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 8519 झाली असून 898 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 02 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 219 झाली आहे.

 पिंपळगाव वासियांनी केली स्वयंस्फूर्तीने कोरोना चाचणी;19 व्यक्ती पॉझिटिव्ह

लाखांदुर तालुक्यातील बारव्हा प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत असलेल्या  पिंपळगाव येथील गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन आरोग्य विभागाच्या सहकार्याने गावात कोरोना चाचणी शिबिराचे आयोजन केले. या शिबिरात 171 नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कोविड चाचणी करून घेतली. यात 20 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. यापैकी 19 व्यक्तींना लाखांदुर येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तर एक व्यक्तीला गृह विलगिकरणात ठेवण्यात आले आहे.तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नलिनीकांत मेश्राम, डॉ. रुपेश नखाते, डॉ. निधी शहारे, विजया मडावी, आशा वर्कर यांच्या सहकार्याने हे शिबीर यशस्वी झाले. चाचण्यासाठी गावकऱ्यांची भूमिका खूप महत्वाची असल्याचे डॉ. नलिनीकांत मेश्राम यांनी सांगितले.

इतर गावांनी अनुकरण करावे

कोरोना चाचणीसाठी पिंपळगाव वासियांनी घेतलेला पुढाकार प्रशंसनीय असून आदर्श निर्माण करणारा आहे. असाच पुढाकार अन्य गावांनी घेऊन चाचणीसाठी पुढे येणे आवश्यक आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या होणे  गरजेचे  आहे. अशा प्रकारचा पुढाकार घेणाऱ्या गावात आरोग्य विभागामार्फत  विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येईल. – जिल्हाधिकारी संदीप कदम