
गोरेगाव,दि.0१ः- तालुक्यातील परशुराम विद्यालय मोहगाव बु.या शाळेतील जेष्ठ शिक्षक डी.डी.चौरागडे वयोमानानुसार 31 आँक्टोंबरला सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा शाळेच्या व संस्थेच्यावतीने सेवानिवृत्तीपर सपत्नीक सत्कार करण्यात आले.याप्रसंगी परशुराम शिक्षण प्रसारक संस्था गोरेगावचे सचिव व माजी खासदार खुशालचंद्र बोपचे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.तर मंचावर शिक्षण संस्थेच्या सदस्या सुशिलाताई बोपचे,सेवानिवृत्त मुख्याध्यापक जगदिशप्रसाद अग्रवाल, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख के.टी.पटले,माजी सरपंच हेमलताताई हरिणखेडे,किसनलाल चौहान,एस.बी.पटले.मुख्याध्यापक स्वामी विवेकानंद विद्यालय कारंजा,हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सर्वप्रथम शारदा मातेच्या फोटोचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक बी.डब्लु.कटरे यांनी केले.सेवानिवृत्त होणारे डी.डी.चौरागडे यांचा शाळेचा वतीने शाल,श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.सत्कारमुर्तींनी आपले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी गावातील गणमान्य व्यक्ती, परशुराम विद्यालय मोहगाव बु.व स्वामी विवेकानंद विद्यालय कारंजा येथील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन पी.व्ही.पारधी यांनी तर आभार पी.एम.चुटे यांनी केले.स्नेहभोजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.