शहरात खा. सुनिल मेंढे यांचे हस्ते विकास कामांचे भूमीपूजन

0
223

भंडारा,दि.01- भंडारा नगर परिषद अंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान ठोक तरतूद योजने अंतर्गत शहरातील विविध भागांमध्ये विकास कामांच्या भूमिपूजनाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कोट्यवधी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन नगराध्यक्ष खासदार सुनिल मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले.

शहरातील प्रभाग क्र. ७ येथे शिवछत्रपती नगरात वाय. के. मिश्रा ते सुरेश धुर्वे ते सनाया नगर पर्यंत सिमेंट कॉन्क्रीट रस्ता व नालीवरील पूल बांधकाम (३० लक्ष), प्रभाग क्र. ७ मध्ये सहकार नगर येथे बोहटे ते देशपांडे ते इंगळे ते हटवार यांच्या घरापर्यंत डांबराचा रस्ता व नाली बांधकाम (४९ लक्ष), प्रभाग ७ मध्ये विजू नशीने ते मोहरकर ते मोहरकर यांच्या घरापर्यंत डांबरीकरण रस्ता व नाली बांधकाम (१५ लक्ष), प्रभाग क्र. ७ मध्ये सहकार नगर येथे अवघाते ते रामायण नगरी पर्यंत डांबरीकरण रस्ता व नाली बांधकाम (७६ लक्ष), प्रभाग ७ मध्ये वांदिले ते लेंडे यांच्या घरापर्यंत डांबरीकरण रस्ता व नाली बांधकाम (७८ लक्ष), अशा अनेक कामाचे भूमिपूजन आज करण्यात आले.

यावेळी उपाध्यक्ष दिनेश भुरे, मुख्याधिकारी विनोद जाधव, पाणी पुरवठा सभापती सौ. मधुरा मदनकर, सभापती आशु गोंडाने, रुबी चड्डा, रजनीश मिश्रा, कैलास तांडेकर, सौ. रोशनी पडोळे, आशाताई उईके, सौ. वनिता कूथे, सौ गीता सिडाम, मंगेश वंजारी, मयूर बिसेन, विकास मदनकर, मनोज बोरकर, कृष्णकुमार बत्रा, पप्पू भोपे, अविनाश ब्राम्हणकर, अजीज शेख, अतुल वैरागडकर, राजेश टिचकुले, रोशन काटेखाये, अमित बिसने, विजय गभने, शिव आजबळे, शैलेश मेश्राम, फफहिम शेख, देवेंद्र कोहाड तसेच नागरिक उपस्थित होते.