जिल्हयात 2 मृत्यूसह 137 नवीन बाधित, तर 79 कोरोनामुक्त

0
120

*गडचिरोली,दि.1*: जिल्हयात आज 2 नवीन मृत्यूसह 137 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 79 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 5954 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 4993 वर पोहचली. तसेच सद्या 902 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 59 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. नवीन मृत्यूमध्ये कूरखेडा चिखली मधील 45 वर्षीय महिलेचा व आरमोरीमधील 77 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.86 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 15.15 टक्के तर मृत्यू दर 0.99 टक्के झाला.

नवीन 137 बाधितांमध्ये गडचिरोली 51, अहेरी 20, आरमोरी 14, भामरागड 15, चामोर्शी 10, धानोरा 0, एटापल्ली 0, कोरची 3, कुरखेडा 7, मुलचेरा 3, सिरोंचा 5 व वडसा येथील 9 जणाचा समावेश आहे.

आज कोरोनामुक्त झालेल्या 79 रूग्णांमध्ये गडचिरोली 39, अहेरी 9, आरमोरी 2, भामरागड 4, चामोर्शी 5, धानोरा 4, एटापल्ली 5, मुलचेरा 1, सिरोंचा 0, कोरची 2, कुरखेडा 4 व वडसा मधील 4 जणांचा समावेश आहे.
नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये पोटेगाव रोड 1, इंदिरानगर 1, म्हाडा कॉलनी 1, आनंदनगर 1, बसेरा कॉलनी 1, नवेगाव 13, कॅम्प एरिया 1, चामोर्शी रोड 1, सीआरपीएफ 2, धुंडेशिवनी 1, फुलेवार्ड 1, शहर इतर 2, गणेशनगर 1, जीएनएम होस्टेल 1, गोकुळनगर 5, विद्यापीठ 1, आयटीआय चौक 1, रामनगर 1, रामपुरी वार्ड 2, रेव्हून्यू कॉलनी 1, सदगुरू नगर 1, साईनगर नवेगाव 2, सर्वोदया वार्ड 1, सोनापूर कॉ. 1, एसपी कार्यालय 1, सुयोग नगर 1, टी पाँईंट 1, टेंभा 1, वनश्री कॉलनी 1, इतर जिल्हा 1, गांधी वार्ड 1 जणांचा समावेश आहे. अहेरी मध्ये 17 स्थानिक, नागेपल्ली 3 जणांचा समावेश आहे. आरमोरी 10 स्थानिक, भाकरोंदी 1, देऊळगाव 1, वैरागड 1 जणांचा समावेश आहे. भामरागड बँक ऑफ महाराष्ट्रा 1, 8 स्थानिक, हलेवर 3, कोठी 1 व तहसिल कार्यालय 2 जणांचा समावेश आहे. चामोर्शी मध्ये अनकोडा 1, इल्लूर 2, शहर 1, दुर्गापूर 1, घोट 1, जयरामपूर 1, कृष्णानगर 1, लालडोंगरी 1 जणांचा समावेश आहे. कोरची 3 स्थानिक आहेत. कुरखेडा कढोली 3, स्थानिक 3, रामगड 1 जणांचा समावेश आहे. मुलचेरा बोरेपल्ली 1, छुट्टुगंटा लगाम 2 जणांचा समावेश आहे. सिरोंचा मध्ये पंचायत समिती 2, पोलीस स्टेशन 1, झिंगनूर 1 व रांगेपल्ली 1 जणांचा समावेश आहे. वडसा कन्नमवार वार्ड 1, कोरेगाव 1, सीआरपीएफ 3, आरततोंडी 1, भगतसिंग वार्ड 1, तुकूम 1 व शहरातील इतर 1 जणांचा समावेश आहे.