34.4 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची निवडणूक बिनविरोध;उपाध्यक्षपदी विदर्भातील चंद्रपूरचे मुकूंद दुबे

महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची निवडणूक बिनविरोध;उपाध्यक्षपदी विदर्भातील चंद्रपूरचे मुकूंद दुबे

0
164

चंद्रपूर,दि.04ः-द महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची कार्यकारिणी आणि सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यात 2020 ते 2023 या कालावधीसाठी निवडणूक अधिकारी दिलीप कदम यांनी निवडणूक निकाल जाहीर केला. अध्यक्ष जगन्नाथ शिंदे आप्पासाहेब तर सचिव पदी अनिल भाऊ नावंदर यासह सर्व पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
उपाध्यक्ष पदी चंद्रपूरचे मुकूंद दुबे यांची निवड झाली आहे. तत्पूर्वी आजच्या कार्यकारणी सभेत ऑनलाइन फार्मसी विरोधात तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या. कोविड 19 अंतर्गत केमिस्ट ने केलेल्या कार्याची दखल शासनाने घेतली पाहिजे अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. करोनाची लस सर्व केमिस्टच्या माध्यमातून वितरित करण्याबाबत देखील विचार मांडण्यात आले. ऑनलाइन फार्मसीवर तात्काळ प्रतिबंध न आणल्यास भविष्यात वेगळी नीती अवलंबण्यात येईल असे जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले.

blank