41.3 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ १०० कोटींच्या बावनथडी पुलाचे काम संथ

१०० कोटींच्या बावनथडी पुलाचे काम संथ

0
15

blank

तुमसर- तुमसर-कटंगी आंतरराज्यीय मार्गावरील बावनथडी नदीपुलाच्या बांधकामकारीता राज्य शासनातर्फे १०० कोटी रुपयांचा निधी ३ वर्षांपूर्वीच मंजूर करण्यात आला. दोन वर्षांपूर्वी त्याचे रीतसर भूमिपूजन झाले. अवघ्या दोन-तीन महिन्यांपूर्वी पुलाचे काम सुरू झाले. परंतु सदर पुलाचे काम अत्यंत संथगतीने असल्याने पुलाच्या बांधकामाला १० वर्षांचा कालावधी लागणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.प्रशासनाच्या या कासवगती कारभारामुळे गेल्या ५ वर्षांपासून महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशचा संपर्क तुटला आहे. केवळ व्यापारच नव्हे तर दोन राज्यांतील रक्ताची आणि जिव्हाळ्याची नात्यांमध्येही दुरावा आला आहे. बावनथडी नदीवरील हा पूल केवळ सिमेंट काँक्रीटचा खांब नाही, तर तो दोन राज्यांतील संस्कृती आणि कुटुंबांना जोडणारा पूल आहे. मात्र, ५ वर्षांपासून हा रस्ता बंद असल्याने सीमावर्ती भागातील नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे. लग्नकार्य असो, सुख-दुःखाचा प्रसंग असो वा आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी नागरिकांना अनेक किलोमीटरला वडसा घालून जावे लागत आहे.एकीकडे पुलाचे काम रखडलेले असताना, दुसरीकडे पाथरी येथे बनत असलेल्या ‘बॉक्स कलव्हर्ट’ च्या (मोरी) कामात मोठा सावळागोंधळ सुरू आहे. या कलव्हर्टचा आकार इतका लहान आणि निकृष्ट दर्जाचा ठेवला जात आहे की, तिथून शेतकऱ्यांची बैलगाडी किंवा ट्रॅक्टर जाणेही अशक्य आहे. हा थेट शेतकऱ्यांवर अन्याय आहे. ज्या बांधकामाचा उपयोग सर्वसामान्य शेतकरी आणि वाहनचालकांना होणार नाही, ते काम तात्काळ थांबवावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ठाकचंद मुंगुसमारे यांनी केली आहे.

blank