41.3 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ दुधराम पाटील गहाणे यांचे वृद्धापकाळाने निधन

दुधराम पाटील गहाणे यांचे वृद्धापकाळाने निधन

0
15

blank

अर्जुनी-मोर.-सिरेगावबांध येथील ज्येष्ठ नागरिक तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चामेश्वरजी गहाणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे यांचे वडील दुधराम पाटील गहाणे यांचे शुक्रवार, दि. ५ जून रोजी सकाळी ७.३२ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ९१ वर्षे होते.दुधराम पाटील गहाणे हे शांत, मनमिळावू व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणून परिसरात परिचित होते. त्यांच्या निधनामुळे सिरेगावबांध परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे तसेच मोठा आप्तपरिवार असा परिवार आहे.त्यांच्यावर शनिवार, दि. ६ जून रोजी सकाळी १० वाजता सिरेगावबांध येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.दुधराम पाटील गहाणे यांच्या निधनाबद्दल विविध राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला असून गहाणे परिवाराच्या दुःखात सहभागी होत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

blank