खा.पटेल व आ.अग्रवालांची मागणी रेल्वे पायदळ पूल जनसामान्यांसाठी खुले करा

0
165

गोंदिया,दि.04ः-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्यावतीने गोंदिया शहराला जोडणार्या राजलक्ष्मी चौक ते कुडवा लाईन परिसरातील रेल्वेच्या पायदळ पुलाला सुरु करुन सामान्य नागरिकांसह प्रवाशांना दिलासा देण्याची मागणी खासदार पटेल यांनी बिलासपूर रेल्वेझोनचे प्रमुख यांच्याशी खासदार प्रफुल पटेल यांनी तर नागपूरच्या विभागीय व्यवस्थापकांना आमदार विनोद अग्रवाल यांनी पत्र लिहून पूल सुरु करण्याची मागणी केली आहे. २२ मार्च पासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे रेल्वेने पायदळ पूल बंद केले. त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रेल्वे रुळाच्या पलीकडे २०० मीटर अंतर पूर्ण करण्यासाठी २ ते ३ किमी अंतर पार करावे लागत आहे.  अनलॉक 5 मध्ये शासनाच्या निर्देशानुसार बरेच सार्वजनिक ठिकाणे सुरू करण्यात आले. त्यात बस स्थानक, रेल्वे स्टेशन,बाजारपेठ इत्यादी सुरू करण्यात आली. गोंदिया रेल्वे स्थानाकावरूनही नव्याने ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. अश्या परिस्थितीत पलीकडून मुख्य द्वारपर्यंत प्रवाशांना ये-जा करण्यास त्रास सहन करावा लागतो.