▪️निबंध स्पर्धेत अधिकाधीक संख्येने भाग घेण्याचे आवाहन
गोंदिया- प्रत्येक भारतीय नागरिकांमध्ये संविधान विषयक जनजागृती निर्माण करण्यासाठी, तसेच प्रत्येक भारतीय जनमानसात संविधानाचे मूल्य रुजविण्यासाठी 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या निबंध स्पर्धकरीता प्रवेश नि:शुल्क आहे. निबंध स्पर्धेचा विषय “बहुसंख्यक समाजाच्या समस्या न सुटण्यास जबाबदार कोण? संविधान की सरकारे” आहे तर वरील विषयावर मराठी, हिंदी किंवा इंग्रजी कोणत्याही एका भाषेत 1000 शब्द मर्यादेत निबंध लिहता येईल. विजेत्यांसाठी प्रथम 3000/-, द्वितीय 2000/-, तृतीय 1000/- आणि उत्तेजनार्थ 500/- रु. चे 5 पारितोषिके देण्यात येणार आहेत. सहभाग घेण्यासाठी प्रस्तुत राज्यस्तरावरील या निबंध स्पर्धेत वय 15 वर्ष ते यापेक्षा अधिक वयाचे नागरिक विद्यार्थी शिक्षक डॉक्टर वकील व्यावसायिक व सर्व महिला पुरुष यात सहभागी होऊ शकतात, निबंध स्पर्धेत निर्धारित केलेल्या विषयावर एक हजार शब्दांचा मराठी, हिंदी अथवा इंग्रजी निबंध लिहून पाठवणे आवश्यक आहे. सदर निबंध कोणत्याही एका भाषेत पाठवावे, निंबध परीक्षण उच्च विद्याविभूषित गणमान्य विद्वान यांच्या द्वारे केली जाईल. परीक्षकांच्या द्वारे घोषित केलेले निकाल सर्वमान्य राहतील, निबंध स्पर्धेच्या पुरस्काराचे वितरण दिनांक 26 नोव्हेंबर 2020 ला आयोजित संविधान दिनाच्या कार्यक्रमात ऑनलाईन वितरीत केले जाईल, प्रस्तुत निबंध दिलेल्या ईमेल आयडीवर तसेच वरील व्हाट्सअप क्रमांकावर पाठविणे आवश्यक आहे, सदर निबंध मराठी अथवा हिंदी विषयाकरीता देवनागरी लिपीत टाईप करून वा स्वहस्ताक्षरात लिहून पूढीलप्रमाणे दिलेल्या मेल अथवा व्हाट्सअप क्रमांकावर पाठवावे, निबंध स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी आपले स्वतःचे अल्पपरिचय नाव शिक्षण व्यवसाय पत्रव्यवहाराचा पत्ता ई-मेल मोबाईल क्रमांक निबंधाच्या पहिल्या पानावर लिहिणे आवश्यक आहे तसेच स्वतःचे पासपोर्ट आकाराचे फोटोही पाठविणे अनिवार्य आहे, सदर विषयाच्या अनुषंगाने लिहिलेले निबंध निबंधात आपल्या स्वतःचे विचार असणे अपेक्षित आहे. निबंध सादर करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2020 ही आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपले निबंध [email protected] या मेलवर अथवा 9405433464 9404841997, 9049808909, या वाटस्अँप क्रमांकावर दिनांक 24 नोव्हेंबर 2020 पंर्यत दुपारी 12 वाजेपर्यंत पाठवणे आहे. स्पर्धेत प्रवेश पूर्णत: निशुल्क असुन निबंध स्पर्धेत अधिकाधीक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संविधान मैत्री संघातर्फे करण्यात आले आहे.