शपथविधीचा दिवस ठरला;नितीश कुमार सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होणार

0
272

पाटणा– जनता दल संयु्क्तचे नेते नितीश कुमार सातव्यांदा बिहार राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता त्यांचा शपथविधी सोहळा पार पडेल. बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये निसटता विजय प्राप्त केल्यानंतर सत्ताधारी एनडीएची आज रविवारी एक महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत भाजप-जेडीयू यांच्या नेतृत्वातील एनडीएच्या मुख्य नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाली.

JD(U) Chief Nitish Kumar named as the next Chief Minister of Bihar, in NDA meeting at Patna

Visuals from NDA meeting at Patna, Bihar pic.twitter.com/Xz8Fr0WDw5

बैठकीत, भाजपा, जेडीयू यांच्यासहित सहकारी पक्ष हिंदूस्तानी आवाम मोर्चा आणि विकासशील इन्सान पार्टीचे आमदारदेखील सामिल होते.

तसेच काही अपक्ष आमदारांनीही एनडीएला समर्थन देण्याची तयारी दाखवली आहे. एनडीएने निवडणुकीच्या आधीच नितीश कुमार यांना आपला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं होतं. भाजपाने याआधीच स्पष्टपणे सांगितलं होतं की, एनडीएमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळो, बिहारच्या मुख्यमंत्री पदी नितीश कुमारच राहतील.

नितीश कुमार यांचा मागचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी आधीच राज्यपाल फागू चौहान यांना आपला राजीनामा दिला आहे. राज्यपाल यांनी नितीश कुमार यांनी नवे सरकार बनण्याआधी तात्पुरत्या काळासाठी कार्यवाहक मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडायला सांगितले आहे. निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर नितीश कुमार यांनी म्हटलं होतं की, एनडीएच्या आमदारांची बैठक लवकरच बोलावली जाईल. त्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला जाईल. निवडणुकीत भाजपला 74 जागा तर जेडीयूला फक्त 43 जागा मिळाल्या आहेत.