राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे बळीराजा अभिवादन

0
125
नागपूर,दि.17ः-राष्ट्रीय ओबीसी महासंघ दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा बलिप्रतिपदेच्या दिवशी बळीराजांचे स्मरण करुन परिवर्तन कोचिंग क्लास दिघोरी नागपूर येथे एका बैठकीत अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष गिरीश पांडव तसेच प्रमुख वक्ते म्हणून सकाळ वृत्तपत्राचे सहसंपादक प्रमोद काळबांडे,भारतीय पिछडा समाज प्रदेशाध्यक्ष प्रा.रमेश पिसे उपस्थित होते. बळीराजाच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण केल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रास्ताविक शरद वानखेडे यांनी केले. प्रमोद काळबांडे म्हणाले की आज ओबीसी समाजामध्ये अनेक समस्या असून त्यावर प्रत्येकाने एक एक प्रश्न घेऊन कार्य करायला पाहिजे आज बेरोजगारी, महिला ,युवक, शिक्षण या सर्व क्षेत्रात ओबीसी समाजांने त्यागाची भूमिका घेऊन काम केल्यास संपूर्ण समाजाला यश प्राप्त होईल. आज बळीराजाला पाताळात घालणारा बटू वामन विविध अंगाने समोर येऊन ओबीसीचे विखंडन करीत आहे. त्याकरिता संघटन हेच शक्तिस्थान असून त्या माध्यमातून आपल्याला बलशाली व्हावे लागेल.प्रा.रमेश पिसे म्हणाले की ओबीसी समाजामध्ये अजूनही ही जाणीव नसल्यामुळे निवडणुकीच्या काळात तो भरकटलेल्या सारखा वावरत असतो.आज पदवीधरांची नोंदणी तीन ते चार टक्के झाली असताना पदवीधरांची निवडणूक लादण्यात आली यामध्ये अजूनही पदवीधरांसाठी नोंदणी ही गरजेची नाही तर विद्यापीठातून  पदवी परीक्षा पास झालेल्यांना निवडणुकीमध्ये समाविष्ट करण्यात यावे. आजही बळीराजा हे आपल्या आपल्या अस्मितेचे असताना अजूनही आपल्याला पाताळात टाकण्याची भाषा वापरली जाते ह्यापासून सावध असणे गरजेचे आहे. सभेचे अध्यक्ष गिरीश पांडव म्हणाले ओबीसीच्या समस्यांचा अंतर्भाव राजकीय पक्षांनी आपल्या अजेंड्यात करायला काय हरकत आहे. हा समाज आज 52 टक्के आहे म्हणून ओबीसी जनगणना हा महत्त्वाचा मुद्दा आहे .कार्यक्रमाचे संचालन परिवर्तन क्लासचे संयोजक प्रा.अरुण वराडे यांनी केले. या कार्यक्रमाला गणेश नाखले,शकील पटेल, विकास गौर,, संजय पन्नासे,नंदा देशमुख,लिना कटरे,गुणेश्वर आरीकर,उदय देशमुख, रोशन कुंभलकर ,सुहास नानवटकर, राजू मोहन, योगेश्वर चौधरी, गोविंद वरवाडे,सुधाकर तायवाडे, विश्वास नेते, वैभव वराडे, जय वराडे, संजय झाडे हे उपस्थित होते.