पोलीस व सैन्यभरतीचे निःशुल्क प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेला करडी ठाणेदाराची मदत

* ठाणेदार स्वप्नील नेवसे यांचे अभिनंदनास्पद कार्य

0
171
करडी(पालोरा):- क्रिडा तसेच सैन्य व पोलीस भरतीचे निःशुल्क प्रशिक्षण देणाऱ्या संकुलन क्रिडा मंडळ निलज खुर्द या संस्थेला करडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार स्वप्नील नेवसे यांनी स्वखर्चातून दिवाळीच्या शुभमुहूर्तावर जुते-मोचे, थाळी, भाले व लोखंडी गोळे भेट देत दिलेला शब्द पाळला.
कोणत्याही प्रकारची शैक्षणिक साहित्य नसतांना केवळ इच्छाशक्ती व जिद्दीच्या भरवस्यावर निलज खुर्द सारख्या लहानशा गावातील बरडा मैदानावर उत्कृष्ट खेळाडू तयार करण्याचे काम गावातील प्रशिक्षक मंगल भोयर करीत आहेत. त्यांच्या प्रशिक्षणाच्या बळावर अनेक प्रशिक्षणार्थी सैन्यात, पोलीस विभाग व क्रिडा प्रबोधनीत भरती झाले. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होवून गावाचा व जिल्हयाचा लौकीक वाढवीत आहेत. क्रिडा तसेच सैन्य व पोलीस भरतीचे निःशुल्क प्रशिक्षण देणाऱ्या संकुलन क्रिडा मंडळ निलज खुर्द या संस्थेला करडी पोलीस स्टेशनचे
ठाणेदार स्वप्नील नेवसे यांनी स्वखर्चातून दिवाळीच्या शुभमुहूर्तावर जुते-मोचे, थाळी, भाले व लोखंडी गोळे भेट दिली. यावेळी प्रशिक्षणार्थी खेळाडूंनी दाखविलेल्या क्रिडा कौशल्याचे त्यांनी तोडभरून कौतूक केले.
‘निःशुल्क कार्य करणारे समाजात बोटावर मोजण्यासारखे आहेत. संकुलन क्रिडा मंडळ व प्रशिक्षक मंगल भोयर यांच्या नि:शुल्क प्रशिक्षणातून आतापर्यंत शेकडो विद्यार्थी पुणे क्रिडा प्रबोधनीत भरती झाले. अनेक खेळाडू जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध खेळात मेडल प्राप्त आहेत, शुशिकला आगासे सारखी आंतरराष्ट्रीय सायकलींंगपटू तयार होवून तीने देशाला गोल्ड मिळवून दिले आहेत.’
– स्वप्नील नेवसे, ठाणेदार पोलीस स्टेशन करडी.