
देवरी,दि.23ःमागील वर्षी शासनाने शेतकर्यांना १८00 रुपये धानाला हमी भाव आणि ७00 रुपये बोनस देऊन सहकार्य केले होते. परंतु कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशासह राज्यात उद्भवलेल्या आर्थिक संकटातही यावर्षी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकर्यांच्या धानाला १८00 रुपये हमी भाव व ७00 रुपये बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. अशाप्रकारचा निर्णय घेऊन महाविकास आघाडी सरकार हे नेहमी शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपने उभे राहत असल्याचे काम करीत आहे, असे मत आमदार सहषराम कोरोटे यांनी एका प्रसिद्धि पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
प्रसिद्धी पत्रकानुसार, वारंवार पडणार्या दुष्काळामुळे आर्थिक रित्या हवालदिल झालेल्या शेतकर्याला मागील वर्षी बोनसच्या रुपात हजारो रुपयाची आर्थिक मदत झाली होती. त्यामुळे शेतकरी आनंदीत होता आणि कर्जबाजारी होण्यापासून वाचला. तसेच त्याची आर्थिक परिस्थिती सुद्धा बळकट झाली होती. परंतु यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वामुळे देशासह राज्याची आर्थिक स्थिति बिकट आहे. अशा परिस्थितीत ही बळीराजाच्या जीवनात नैराश्य येऊ नये, तो दु:खावला जाऊ नये, त्याला योग्य न्याय मिळावा म्हणून यावर्षी सुद्धा महाविकास आघाडी सरकारने धानाला १८00 रुपये हमी भाव आणि ७00 रुपये बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारचे शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घेवून सरकार नेहमी शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपने उभे राहण्याचे काम करीत असल्याचे मत आमदार कोरोटे यांनी प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केले आहे.





