34.4 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home राजकीय राज्य सनियंत्रण समितीच्या सदस्यपदी आ. कोरोटे यांची निवड

राज्य सनियंत्रण समितीच्या सदस्यपदी आ. कोरोटे यांची निवड

0
379

blank

देवरी,दि.29ः-राज्यातील आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणार्‍या अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी या कायद्याची अंमलबजावणी योग्य रीतीने करण्याकरिता शासनातर्फे राज्यस्तरीय सनिंत्रण समिति स्थापित करण्यात आली असून या समिति मध्ये राज्य जनजाती सल्लागार परिषदेचे तीन अनुसूचित जमाती सदस्याचे तरतूद असल्याने या राज्य सनिंयत्रण समितीच्या सदस्यपदी आमगांव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांची निवड करण्यात आली आहे. आमदार कोरोटे यांच्या निवडीने विधानसभा क्षेत्रातील पक्ष कार्यकत्यांसह जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
यात सविस्तर असे की, या समिति मध्ये एकूण अकरा सदस्य असून यात अध्यक्षपदी राज्याचे मुख्य सचीव आणि सदस्य सचीव पदी आदीवासी संशोधन व प्रक्षिक्षण संस्था पुणे चे आयुक्त तर इतर सदस्य पदी महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव, पंचायत राज व ग्रामविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव, वनविभागातील प्रधान सचिव, आदिवासी विकास विभागाचे सचिव, महाराष्ट्र राज्य नागपुर वनविभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक, आदिवासी विकास विभागाचे आयुक्त आणि राज्य जनजमाती सल्लागार परिषदेचे सदस्य आमदार लताबाई सोनवने, आमदार डॉ. किरण लाहमटे व आमदार सहषराम कोरोटे यांचा समावेश असून या समिति द्वारे वनअधिकारांना मान्यता देवून सुपूर्द प्रक्रियेवर देखरेख करुण सादर केलेल्या प्रस्तावाची तपासणी करने आणि सदर अहवाल शासनाला सादर करने असे कार्य आहे. या समितिवर आमगांव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांची निवड झाल्याने क्षेत्रातील पक्ष कार्यकर्तांसह जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

blank