34.4 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ संविधान मैत्री संघाचे जागर कार्यक्रम 20 डिसेंबरला

संविधान मैत्री संघाचे जागर कार्यक्रम 20 डिसेंबरला

0
27

*गोंदिया,दि.१८:-* द्विमासिक संविधान जागर कार्यक्रम अंतर्गत संविधान मैत्री संघ व अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त वतीने
क्रांतीकारी संत गाडगेबाबा स्मृतीदिना निमित्त रविवार दि.20 डिसेंबर 2020, सकाळी 11:30 वाजता पासुन स्थानीक चंद्रशेखर वार्डातील एम.जी.पैरामेडीकल कॉलेज हॉल अशोक बुद्धविहार मुर्री रेल्वे चौकीजवळ प्रोत्साहन पर विविध जागर कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहे.
कार्यक्रम तिन सत्रात पार पडणार असुन प्रथम सत्रात वक्तृत्व स्पर्धा, काव्य स्पर्धा प्रा. विनोदकुमार एम.माने यांच्या संचालनामध्ये आयोजित होणार आहे. “कर्मयोगी संत गाडगेबाबांची लोकजागृतीची पार्श्वभूमी स्वच्छता व अंधश्रद्धा” या विषयावर वक्तृत्व स्पर्धा सीनियर गट व जूनियर गटासाठी आणि “विज्ञानवादी संत गाडगेबाबांचे कीर्तनातील तत्वज्ञान” या विषयावर काव्य स्पर्धा सीनियर गट व जूनियर गटासाठी आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धेत भाग घेणा-या विजेत्याना नगद पारितोषिक देण्यात येणार असुन स्पर्धेत प्रवेश निशुल्क आहे.
द्वितीय सत्रात अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे जागर कार्यक्रम अनिस जिला संयोजक अनिल गोंडाने यांच्या संचालनामध्ये पार पडणार तर तिस-या सत्रात संविधान मैत्री संघाचे उद्दीष्ट- जाहिरनामा, सभासद निर्माण व सर्वसमाज जयंती समिती सन 2021 कार्यकारिणी गठन कार्यक्रम अतुल सतदेवे यांच्या संचालनामध्ये पार पडणार आहे.

blank