कोणत्याही संघटनेवर अन्याय होणार नाही -उषा मेंढे

0
18

गोंदिया,दि.९ – जिल्हा परिषदेची अध्यक्ष झाल्यापासून माझा अनेकांनी सत्कार केला. परंतु, शिक्षक समितीचा सत्कार व स्नेहामुळे भारावून गेले आहे. जिल्हा परिषदेचे पालकत्व माझ्यावर असल्याने कोणत्याही संघटनेवर qकवा व्यक्तीवर अन्याय होणार नाही याची ग्वाही देतो, असे प्रतिपादन जि. प. अध्यक्षा उषा मेंढे यांनी काढले.
जि. प. अध्यक्ष उषा मेंढे व उपाध्यक्ष रचना गहाणे यांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा गोंदियाच्यावतीने जि. प. अध्यक्षाच्या दालनात सत्कार करण्यात आला.समितीचे जिल्हाध्यक्ष दीक्षीत व सरचिटणीस खोब्रागडे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान शिक्षक समितीचे जिल्हा व तालुका पदाधिकाèयांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार व स्वागत केले. सत्कार समारंभात कार्याध्यक्ष शेषराव येडेकर, चिटणीस पी. आर. पारधी, डी. एल. गुप्ता, एन. बी. बिसेन, शरद उपलपवार, नानिकराम चिर्वतकर, के. के. नेवारे, राजू बोपचे, सिद्धार्थ खोब्रागडे, पी. बी. सर्याम, दिलीप नवखरे, बी. एस. केसाळे, सुंदर बडे, एच. के. पाउलझगडे, उमेश रहांगडाले, एस. पी. पटले, ए. टी. टेंभुर्णीकर, शिदने व आदर्श शिक्षिका दीक्षा फुलझेले व अन्य सभासद बंधू-भगिनी उपस्थित होते. संचालन तालुका अध्यक्ष एन. बी. बिसेन तर आभार प्रदर्शन बी. एस. केसाळे यांनी केले.