34.4 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ तेरवीच्या भोजनातून हगवान व उलटीचा त्रास

तेरवीच्या भोजनातून हगवान व उलटीचा त्रास

0
155

blank

अर्जुनी-मोर,दि.07ः- तालुक्यातील बोदरा देऊळगाव येथील सूरदास वासुदेव झोळे यांच्या घरी 6 जानेवारीला सायकांळी तेरवीनिमित्त झालेल्या जेवणानंतर 174 व्यक्तींना हागवन व उलटीचा त्रास झाल्याने गावात आरोग्य विभागाने नागरिकांच्या तपासणीसाठी हंगामी कॅम्प लावले आहे.जेवणातून विषबाधा झालेल्या 174 पैकी 9 रुग्ण ग्रामपंचायत कार्यालयातील हंगामी कॅम्पमध्ये उपचार घेत आहेत.तर उर्वरित नागरिकांची परिस्थिती आटोक्यात असून प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना बाकटीचे वैद्यकीय अधिकारी  डॉ.कुंदन कुलसंगे यांची चमू परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.ज्यांना त्रास नाही अशांना लगेच घरी सोडण्यात येत आहे.

blank