34.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ भंडारा येथील घटना दुर्देवी व वेदनादायी : खा. प्रफुल पटेल

भंडारा येथील घटना दुर्देवी व वेदनादायी : खा. प्रफुल पटेल

0
116

blank

भंडारा,दि.०९::: येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशु केयर युनिटला शार्ट सर्कीटमुळे आग लागून १० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अंत्यत दुर्देवी आणि वेदनादायी आहे. या घटनेमुळे नवजात बालकांच्या कुटुंबीयांवर सुध्दा संकट कोसळले असून त्यांना या संकटातून सावरण्याची शक्ती देवो अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करताे. या घटनेत ज्या कुटुंबातील नवजात बालकांचा मृत्यू झाला त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. ही घटना नेमकी कशामुळे घडली याची चौकशी करण्याचे आदेश दिले असून यातील दोेषींवर निश्चित कारवाई केली जाईल. या संपूर्ण घटनेकडे राज्य शासनाचे सुध्दा गांभिर्याने लक्ष आहे. सदर घटने संदर्भात राज्याचे गृहमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री श्री अनिल देशमुख यांचेशी मी चर्चा केली आणि त्यांना तातडीने सामान्य रुग्णालय भंडारा येथे घटना स्थळी भेट देऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले . तसेच राज्याचे मुख्यमंत्री यांना सुद्धा मुख्यमंत्री सहायता निधी तुन आर्थिक मदत मिळण्या साठी विनंती केली आणि राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री यांना घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

blank