40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ बिरसी विमानतळावरील ४४ सुरक्षा रक्षकांची सेवा समाप्त

बिरसी विमानतळावरील ४४ सुरक्षा रक्षकांची सेवा समाप्त

0
190

blank

गोंदिया,दि.12: बिरसी विमानतळाच्या विस्तारीकरणात प्रकल्पग्रस्त झालेल्या ४४ बेरोजगारांना सुरक्षा रक्षक म्हणून नेमण्यात आले होते. तब्बल १२ वर्षे त्यांनी सेवा दिली. मात्र आता विमानतळ प्राधिकरणाने त्यांना कामबंदचे आदेश दिल्यामुळे सुरक्षारक्षकांत कमालीचा संताप पसरला आहे.
विमानतळ निदेशकांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. जिल्ह्याचा विकास जलदगतीने व्हावा तसेच परिसरातील नागरिकांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने तत्कालीन केंद्रीय उड्डयनमंत्री प्रफुल पटेल यांनी मोठ्या परिश्रमाने बिरसी विमानतळाच्या विस्तारीकरणाला चालना दिली. त्याकरिता लगतच्या बिरसी, कामठा, परसवाडा आणि झिलमिली या गावातील नागरिकांच्या शेतजमिनी व घरे देखील अधिग्रहित करण्यात आली. परिसरातील नागरिकांनी केलेल्या मागणीमुळे विमानतळ प्रशासनाने परिसरातील ४४ बेरोजगारांना सुरक्षा रक्षक म्हणून रोजगार उपलब्ध करुन दिला. आजघडीला त्यांच्या सेवेला तब्बल १२ वर्षाचा काळ लोटला आहे. या सेवेवरच ते आपल्या कुुटुंबाचा गाडा चालवत आहेत. परंतु एवढी वर्षे सेवा दिल्यानंतर आता विमानतळ प्रशासनने या सर्व कामगारांना कामावरुन काढून कायमचे कामबंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळे त्या सुरक्षा रक्षकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. याकरिता विमानतळ प्राधिकरणाने कर्मचाèयांना कोणतीही सुचना qकवा नोटीस दिले नाही. त्यामुळे विमानतळ प्रशासन लोकशाही मूल्यांना पायदळी तुडवत असून स्थानिक नागरिकांवर दडपशाहीचा अवलंब करीत असल्याचा आरोप या सुरक्षारक्षकांनी लावला आहे.
प्रशासन विसरले आश्वासन
जिल्ह्याची शान असलेल्या बिरसी विमानतळ प्रकल्पाच्या विस्तारीकरणाला २००७ पासून सुरुवात झाली. तेव्हा या प्रकल्पात स्थानिक नागरिकांना व प्रकल्पग्रस्तांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन तत्कालीन जिल्हा व विमानतळ प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी दिले होते. त्यानुसार बिरसी परिसरातील अनेक बेरोजगारांना कामावर रोजगार उपलब्ध करुन दिला. मात्र आता प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन १२ वर्षे लोटल्यानंतर त्याच कर्मचाèयांना कामावरुन कमी करण्यात आले. प्रशासनाला आपल्याच आश्वासनांचा विसर पडला आहे.
अन्यथा कुटुंबासह आंदोलन
तब्बल १३ वर्षे सुरक्षा रक्षकांनी विमानतळ प्राधिकरणात सुरक्षा रक्षक म्हणून काम केले. त्यांना तोच एक भरवशाचा रोजगार होता. मात्र आता विमानतळाची अवस्था बळकट झाल्यामुळे आधीच घरे, जमिनी हिरावून बसलेल्या कर्मचाèयाना अचानक कामावरुन कमी केल्यामुळे त्यांच्यात असंतोषाची लाट पसरली आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करुन पुन्हा कामावर घेण्याकरिता विमानतळ प्राधिकरणाला निर्देश द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. कामावर परत न घेतल्यास कुटुंबासह रस्त्यावर उतरण्याचा इशारा सुरक्षा कर्मचाèयांनी दिला.
विमानतळ प्रशासन मोठी दडपशाही करत असून ते स्थानिक नागरिकांवर अन्याय करत आहेत. कोणतेही कारण नसताना विमानतळ प्रशासनाने सुरक्षा रक्षकांन कामावरुन बंद केले. हा स्थानिक नागरिकांवर अन्याय आहे. आता नोकरी गेल्यामुळे कसे जगावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पंकज वंजारी, सचिव, विशाल सुरक्षा मजुर संघ बिरसी

blank