
गोंदिया,दि.12: डिझेल, पेट्रोल आणि घरगुती गॅसचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे महागाई वाढत असून त्याचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. इंधन दरवाढीचा निषेध करुन तत्काळ किमती कमी करण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे करण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले की, केंद्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यापासून डिझेल, पेट्रोल आणि घरगुती वापराच्या गॅसची qकमत मोठ्या प्रमाणात वाढली. दिवसेंदिवस वाढ करण्यातच येत असल्यामुळे त्याची झळ सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. इंधन आणि गॅसच्या किमती कमी करण्यात याव्यात. दररोज वाढणाèया किमतीचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला.
निवेदन देणाèया शिष्टमंडळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किशोर तरोणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, निप्पल बरैय्या, उध्दव मेहेंदये, योगेश नाकाडे, त्रिरत्न शहारे, रितेश चौरे, योगेश कासार, संदेश नेवारे, भोजराज नेवारे, निखील सोनवाने, तुकाराम मडावी, भागवत मैंद, सदाशिव सोनवाने, साहिल मडावी, राजेंद्र जांभुळकर, पुरुषोत्तम दोनोडे, सुरेश कोरे, ओमकार सांगोळे, रोशन गजबे, आशीष जुगनाके, प्रतीक बडोले, सुदेश राखडे, मंगेश अग्रवाल आqदचा समावेश होता.
गोरेगाव विद्यार्थी संघटनेच्यावतीने ही निवेदन सादर करण्यात आले. यावेळी अध्यक्ष राजकुमार बोपचे, सरपंच सोमेश रहांगडाले, शेखर बघेले, बाबा यावलकर, योगश चौधरी, विजय कुर्वे, प्रदीप जैन, गिरधारी कटरे, लालचंद चव्हाण, राजेश बिसेन, भुपेश गौतम, कमलेश बारेवार, चौकलाल येडे उपस्थित होते.
आमगावात इंधन दरवाढ विरोधात राष्ट्रवादीचे निवेदन



