33.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home राजकीय जनतेच्या समस्या व मागण्यांसाठी कार्यकर्त्यांनी लढा द्यावा : केशवराव मानकर

जनतेच्या समस्या व मागण्यांसाठी कार्यकर्त्यांनी लढा द्यावा : केशवराव मानकर

0
42

blank

गोंदिया : कोरोना काळात प्रत्यक्ष होणारी हि प्रथम जिल्हा बैठक आहे. या कोरोना काळात जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारने लोकांना दिलासा देण्याऐवजी त्यांना त्रास दिला जात आहे. वाढीव वीज बिल, शेतकऱयांच्या समस्या आदी अनेक प्रश्न आहेत. भाजपचा कार्यकर्ता हा लढवय्या असून जनसमस्यांसाठी नेहमीच आंदोलन करीत आलेला आहे. आता कार्यकर्त्यांनी जनतेच्या समस्या व मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून लढा द्यावा असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर यांनी केले. ते १२ जानेवारी रोजी पवार सांस्कृतिक भवनात आयोजित जिल्हा विस्तारित बैठकीत अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
या वेळी प्रामुख्याने प्रदेश सचिव संजय पुराम, आ. डॉ. परिणय फुके, माजी आ. हेमंत पटले, माजी आ. गोपालदास अग्रवाल, माजी आ. भेरसिंग नागपुरे,  माजी आ. रमेशभाऊ कुथे, माजी आ. खोमेशभाऊ रहांगडाले, माजी आ. भजनदास वैद्य, भंडारा – गोंदिया जिल्हा संपर्क प्रमुख वीरेंद्र अंजनकर, माजी जि. प. अध्यक्ष नेतराम कटरे, नगराध्यक्ष अशोक इंगळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रचनाताई गहाणे, जिल्हा महामंत्री संजय कुलकर्णी, लायकराम भेंडारकर, कोषाध्यक्ष संतोष चौहान,  महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष भावना कदम, भाजयुमो जिल्हाध्यक्ष ओम कटरे, अनुसूचित जाती मोर्चा जिलाध्यक्ष जे. डी. जगनित, आदिवासी मोर्चा जिल्हाध्यक्ष हनुवत वट्टी, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष उमाकांत ढेंगे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय टेंभरे, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष दीपक कदम, सीताताई रहांगडाले आदी उपस्थित होते. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ माँ साहेब यांना जयंती निमित्त अभिवादन करून व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
पुढे बोलतांना मानकर म्हणाले कि कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या निर्णयांची माहिती व योजना लोकांपर्यंत पोहोचवुन त्याचे लाभ त्यांना मिळवून द्यावे. सध्या जिल्ह्यात ग्राम पंचायतीच्या निवडणुका सुरु असून संपूर्ण ताकदीनिशी त्यात विजय मिळवायचा आहे. तसेच काही दिवसात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने कामाला लागायचे असून जनसंपर्क वाढवायचे असल्याचे ते म्हणाले. येत्या २० मार्च रोजी शेतकऱ्यांच्या व इतर अनेक मागण्यांना घेऊन गोंदिया येथे भव्य मोर्चा आयोजित करण्यात आलेला असून त्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. या वेळी संजय पुराम यांनी संघटनात्मक बाबीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले, आ. परिणय फुके यांनी आगामी निवडणुकीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून विरोधी पक्षात कार्यकर्त्यांची भूमिका विशद केली. यावेळी संपर्क प्रमुख वीरेंद्र अंजनकर यांनी सर्व मंडळाचा आढावा घेतला व ‘प्रभू श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र निधी समर्पण महाअभियान’ या संदर्भात माहिती देऊन १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या या रामकार्यात सक्रिय सहभाग व सहकार्य करण्याचे सांगितले. या प्रसंगी माजी आ. हेमंत पटले, माजी आ. गोपालदास अग्रवाल, माजी जि. प. अध्यक्ष नेतराम कटरे, नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकाऱयांचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच इतर पक्षातुन आलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपच्या विचारधारेवर विश्वास ठेऊन पक्षात प्रवेश केला त्यांचे पक्षातर्फे स्वागत करण्यात आले. या वेळी भंडारा येथील शासकीय रुग्णालयात घडलेल्या आगीच्या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी झालेल्या १० नवजात बाळांना श्रद्धांजली देण्यात आली. बैठकीचे संचालन जिल्हा महामंत्री मदन पटले यांनी केले. यावेळी सर्व मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

blank