41.3 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home Top News पिताबंरटोला,बकी व जांभळी गेटवरील पर्यटकांसाठी रिपब्लीक डे आँफर,शुल्कमध्ये 50 टक्के सवलत

पिताबंरटोला,बकी व जांभळी गेटवरील पर्यटकांसाठी रिपब्लीक डे आँफर,शुल्कमध्ये 50 टक्के सवलत

0
55

blank

गोंदिया,दि.25ः- तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यच्या मधोमध असलेले नागझिरा अभयारण्य वन पर्यटकांना साद घालते. नवेगाव- नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यंमध्ये वसलेला आहे. हा प्रकल्प कान्हा, पेंच आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पांना जोडणारा दुवा आहे. जैवविविधता संवर्धनासाठी अतिशय पोषक असे वातावरण असल्याने हा प्रकल्प खूप महत्त्वाचा आहे. वाघाबरोबरच अनेक वन्यप्राणी आणि पक्षी अधिवास येथे आहेत. या अभयारण्याच्या जवळच कोसमतोंडी, चोरखमारा, अंधारबन, नागदेव पहाडीसारखी प्रेक्षणीय स्थळे आहेत.त्यातच नवेगावबांध अभय़ारण्य परिसरातील पिताबंरटोला,बकी व जांभळी या गेटवरुन पर्यटकांना वन्यप्राण्यांसह निसर्गाचा आनंद घेता यावा यासाठी नवेगाव नागझिरा रिपब्लीक डे आँफऱ योजना 26 जानेवारीपासून 8 फेबुवारीपर्यंत सुरु करण्यात आली आहे.या आफर योजनेत पर्यटकांना गेटवरुन प्रवेशासाठी लागणारे शुल्कमध्ये 50 टक्के सुट देण्यात आली आहे.100 रुपये शुल्क असल्यास 50 रुपये,300 रुपये असल्यास 150 रुपये शुल्क लागणार असून या संधीचा लाभ पिताबंरटोला,बकी व जांभळी या तिन गेटवरील पर्यटकांना मिळणार आहे.या गेटवर ज्यांनी आधीच आनलाईन बुकिंग केली,त्यांना सुध्दा या संधीचा लाभ मिळणार असल्याची माहिती नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे विभागीय वन अधिकारी व्ही.के.बोर्हाडे यांनी दिली आहे.

blank