33.9 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ लोकशाहीची दोन चाके प्रशासन व लोकप्रतिनिधीनी एकत्र काम करण्याची गरज – सुनिल...

लोकशाहीची दोन चाके प्रशासन व लोकप्रतिनिधीनी एकत्र काम करण्याची गरज – सुनिल केदार

0
42

वर्धा, दि २६ :-  शासनाच्या प्रत्येक योजना  जिल्हयातील  शेवटच्या नागरिकांपर्यत,  गोरगरिबाच्या दारापर्यंत पोहोचविण्याचे काम महाविकास आघाडीचे सरकार  करीत असून यामुळे प्रत्येक सामान्य नागरिकांना हे सरकार आपलेसे  वाटत आहे .महिलांची सुरक्षा, शिक्षण आरोग्य तसेच शेतक-यांचे व मजुरांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी  शासन  कटिबद्ध असुन यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या लोकशाहीच्या दोन चाकांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पशु संवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी केले.

blank

भारतीय प्रजासत्ताकाच्या ७१ व्या वर्धापन दिन कार्यक्रमाच्या मुख्य शासकिय ध्वजारोहण कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. यावेळी जनतेला संबोधित करताना ते बोलत होते.  या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर  जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल कोरडे यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.

blank

ज्योतीबा फुले शेतीकरी कर्जमाफी, पिक कर्ज   यासारख्या योजना जिल्हयामध्ये जनतेच्या मदतीने प्रशासनाने चोख राबविल्या आहेत. लोकांचा सहभागाने जितये योजना यशस्वीपणे राबविल्या जातात तिथे दक बाबासाहेब आंबेडकरांनी राबविलेली लोकशाही  खऱ्या अर्थाने  रुजली असे म्हणता येते. हेच राज्याच्या विकासाची द्योतक आहे. यासाठी लोकशाहीच्या  दोन चाके असलेल्या प्रशासन व लोकप्रतिनिधींनी राज्याच्या विकासात एकत्रितपणे काम केले तर राज्य निश्चित विकासात अग्रेसर राहू शकते असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

कोराेना महामारीच्या संकटात महसूल विभाग, पोलिस विभाग, ग्राम विकास विभाग, नगर प्रशासन विभाग, सामाजीक संघटना, शिक्षक संघटना, व्यापारी, उद्योजक, लोकप्रतिनिधी, माध्यमे या प्रत्येकाने चांगली कामगिरी बजावून  वर्धा जिल्हयात  कोरोनाचा प्रादुर्भाव  कमी करण्यासाठी  हातभार लावला.  जिल्ह्यातील गोर गरीब शेतकरी यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी पालकमंत्री म्हणजन मी स्वतः प्रयत्नशील आहे. अनेक वर्षा पासून प्रलंबित असलेला धाम नदी उंची वाढविण्याचा प्रश्न निकाली निघाला असून  निविदा प्रक्रिया झालेली आहे.  त्यामुळे वर्धा शहरातील  नागरिकांचा पुढील 25 वर्षे  पाण्याचा प्रश्न निकाली  निघाली आहे. त्यामुळे वर्धा शहरातील जनतेला सवलतीच्या दरात पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असल्याचेही श्री. केदार यांनी यावेळी सांगितले.

blank

यावेळी पालकमंत्र्याचे हस्ते जिल्हयातील शहिद जवानाच्या विरमातांचा सत्कार तसेच  शहिद हरी लाखे यांची वीरमाता  सिताबाई लाखे व अमित टिपले  यांची विरमाता नलिनी टिपले यांच्या परिवाराला  जमिनीचे पट्टे देऊन  सन्मानित करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाने  ध्वज निधी संकलनाचे उद्दिष्ट वेळेच्या आधी पूर्ण  केल्याबाबत  जिल्हाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.  पोलिस विभागाने वर्धा शहरातील मुत्थुट दरोडा प्रकरणात 12 तासात  आरोपीस अटक केल्याबाबत उपविभागीय अधिकारी पियुष जगताप,  पोलिस निरिक्षक  निलेश ब्राम्हणे,  सत्यजित बंडीवार,  सहाय्यक पोलिस निरिक्षक महेंद्र इंगळे,  सहाय्यक फौजदार  सलाम कुरेशी,  जमादार  प्रमोद पिसे, अनिल कांबळे, राजेंद्र जैसिंगपूर, पवन पन्नासे, विकास अवचट,  संघसेन काबंळे,  अभिजित वाघमारे, तसेच अन्न  पदार्थ अपहार केल्याप्रकरणी पोलिस विभागाचे अधिकारी  सहाय्यक पोलिस निरिक्षक    आशिष गजभिये,  जितेंद्र चांदे यांचा  प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

blank

नवोदय विद्यालय सेलू काटे येथील विद्यार्थ्यांनी 10 व 12 वी मध्ये देशात 17  क्रमांक आयआयटी /एनआयटी मध्ये 19 क्रमांक खेळामध्ये प्राविण्य, कोरोना काळात  उत्कृष्ट कामगिरी केल्या बाबत  प्राचार्य डॉ. एस.जी. गवई यांचा, कोरोना काळात  महात्मा ज्योतिबा फुले  जन आरोग्य  योजना व प्रधानमंत्री  जन आरोग्य योजनेसाठी  आचार्य विनोबा  भावे रुग्णालय,  कस्तुरबा  रुग्णालय सेवाग्राम,  सामान्य रुग्णालय,  राणे  मल्टीस्पेशालिटी,  उपजिल्हा जिल्हा रुग्णालय हिंगणघाट,  लोधा अर्थोपेडिक व डेन्टीस्ट वर्धा,  स्काऊट गाईड मध्ये राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त  कु. तपस्या येवले, नृत्य स्पर्धेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत  पुरस्कार प्राप्त  तीन वर्षाची बालिका अर्णवि  रांचालवार हिचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तर खेलो इंडिया स्पर्धेत  ‍व्दितीय  व सहभागी  देव्यांशी हिवसे , आर्यन ढगे , योगरत्न पुरस्कार प्राप्त आश्विनी सोनवने  यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार तसेच  जिल्हयातील ई-माध्यम प्रतिनिधी , वृत्तपत्र माध्यम प्रतिनिधी व जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी यांनी कोरोना काळात    प्रसार माध्यमाव्दारे सकारात्मक प्रसिध्दी दिल्या बाबत  सन्मानचिन्ह व सन्मापत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच कृषि धोरण 2020 अंतर्गत  महाकृषि उर्जा  अभियानामध्ये नवीन वीज जोडणीचे डिमांड प्राप्त लाभार्थी  सावित्री अय्यर,  कामिनीबाई साठे, प्रेमिला उमाटे,  महादेव भलावी,  रमेश जयस्वाल, हरिभाऊ कडु यांना  डिमांड रक्कम पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला स्वातंत्र्य संग्राम सैनिक,  कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन ज्योती भगत यांनी केले.

blank