33.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home राजकीय वीज पुरवठा खंडीत केल्यास भाजप करणार तीव्र आंदोलन

वीज पुरवठा खंडीत केल्यास भाजप करणार तीव्र आंदोलन

0
72

blank

– उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत ऊर्जा मंत्र्यांना निवेदन
गोंदिया, 27 जानेवारी—कोरोना काळात लोकांचे रोजगार, व्यवसाय बंद पडले होते. अशावेळी त्यांना दिलासा देण्याऐवजी विद्युत विभागातर्फे अवाढव्य वाढीव वीज बिल पाठविण्यात आले. आता बिल न भरल्यास विद्युत पुरवठा खंडीत करण्यात येणार असल्याच्या नोटीस सर्वसामान्य ग्राहकांना पाठविण्यात येत आहे. सर्वप्रथम या नोटीस पाठविणे त्वरीत थांबण्यिात यावे व वीज बिल कमी करण्यात यावे. तसेच कोणत्याही वीज ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित केल्यास भारतीय जनता पार्टी महाविकास आघाडी सरकार विरूद्ध तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा आज बुधवार 27 जानेवारी रोजी भाजपा गोंदिया शहर तर्फे ऊर्जा मंत्र्यांना निवेदनातून देण्यात आला. शहर अध्यक्ष सुनिल केलनका यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत हे निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने शंभुशरणसिंह ठाकूर, अमित झा, संजय मुरकुटे, सुरेश चंदणकर, नरेंद्र तुरकर, अशोक जयसिंघाणी, योगेंद्रसिंह सोलंकी, धर्मेंद्र डोहरे, सतिष मेश्राम, बबली ठाकूर, ॠतुराज मिश्रा, पारस पुरोहीत, संदीप श्रीवास, बंटी शर्मा, अर्पीत पांडे, मिलींद बागळे, नितीन भदाडे, राकेश मित्तल, जसपाल चावला, पलास लालवानी, प्रतिक तिवारी, गुड्डू चांदवानी, सुशिल राऊत, ॠषभ शिवहरे, अनुज लांजेवार, लखन कडव, सचिन तिडके, किशोर चौधरी, भाऊलाल तरोणे, राहुल भालमे, हिमांशू अग्रवाल, ईश्वर पारधी, महेंद्र ऊइके, मंगलेश गिरी, रामेश्वर लिल्हारे आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

blank