33.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home राजकीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागळा पर्यंत पोहोचावे : प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागळा पर्यंत पोहोचावे : प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील

0
51

blank

भंडारा,दि.30ः- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांचा पक्ष आहे. या पक्षाचे कार्यकर्ते शरद पवार यांच्या विचाराशी समर्थित आहेत.पक्षाच्या माध्यमातून तळागळातील जनतेचे समस्या मार्गी लागाव्यात,या उद्देशाने आपले पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते काम करतात,या बाबीचा दृढ विश्वास आहे. मात्र, एवढ्यापर्यंत न थांबता आपला पक्ष तळागळापर्यंत पोहोचावा, या अनुषंगाने प्रत्येक कार्यकर्त्यांने कामाला लागावे, असा सल्ला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिला.
‘परिवार संवाद’ दौरानिमित्त आज (दि.३०) प्रदेशाध्यक्ष भंडारा जिल्ह्यात दाखल झाले. याप्रसंगी मतदार संघनिहाय घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते मार्गदर्शन पर बोलत होते. ना.जयंत पाटील पुढे म्हणाले, राज्यात कसल्याही निवडणुका नसतानाही पक्ष संघटना बळकट व्हावी तसेच पक्षातील कार्यकर्त्यांशी संवाद रहावे, या प्रमुख उद्देशाने आपण आलो आहे. ज्या विधानसभा मतदार संघाला मित्र पक्षासाठी सोडण्यात आले. त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे आपले कर्तव्य आहे. हे कर्तव्यच पार पाडण्यासाठी मी तुमच्यापर्यंत पोहोचलो आहे. गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्यात अनेक समस्या आहेत. त्या समस्या मार्गी लावण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, सुदैवाने या जिल्ह्यामध्ये खा.प्रफुल्ल पटेल, माजी आमदार राजेंद्र जैन याशिवाय अनेक सक्रिय पुढार्‍यांचे नेतृत्व लाभले आहेत. भंडारा जिल्ह्याच्या दौर्‍यापुर्वी माजी आमदार राजेंद्र जैन यांनी जल सिंचन विभागाच्या अनेक प्रकल्पांवर चर्चा केली. सिंचन विभागाच्या सर्व समस्या आपण निश्चितपणे मार्गी लावणार आहोत. परंतु, इतरही समस्या कार्यकर्त्यांनी मार्गी लावण्याच्या अनुसंगाने सक्रिय रहावे. पक्ष संघटनेसंदर्भात बोलताना ते म्हणाले, बुथ कमिटी तयार करून बुथ कार्यकर्त्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जनहितकार्य सर्वसामान्यपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रत्येक कार्यकर्त्यांनी करावे,असाही सल्ला दिला.blank

आगामी काळात होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व शक्तीनिशी निवडणूक लढविणार, असेही सुचना त्यांनी केली. त्यावेळी मंचावर जिल्हाध्यक्ष माजी राज्यमंत्री नाना पंचबुध्दे, आमदार राजुभाऊ कारेमोरे,माजी आमदार राजेंद्र जैन,माजी खासदार मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री विलासभाऊ श्रृंगारपवार, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, सौ. रुपालीताई चाखणकर महिला प्रदेशाध्यक्ष, सक्षणा सलगर युवती प्रदेशाध्यक्षा, महेबुब शेख युवक प्रदेशाध्यक्ष, कार्याध्यक्ष युवक काँग्रेस रविकांत वर्पे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाने, विदर्भ दौरा समन्व्यक प्रविण कुंटेपाटील, मधुकर सांबारे, विजय डेकाटे, सौ. सरिता मदनकर, सौ. सुनंदा मुंडले, यशवंत सोनकुसरे मंचावर उपस्थित होते.
सभेला ॲड. विनयमोहन पशिने, रामलाल चौधरी, डॉ. श्रीकांत वैरागडे, डॉ. रविंद्र वानखेडे, डॉ. सचिन बावनकर, महेंद्र गडकरी, प्रा. एन. आर. राजपुत, ॲड. नेहा शेंडे, राजकुमार माटे, नरेंद्र झंझाड, वासु बांते, लोमेश वैद्य, बाबु बागडे, राजु हेडाऊ, नरेंद्र बुरडे, सोनु खोब्रागडे, नितीन धकाते, सुनिल साकरकर, हेमंत महाकाळकर, राजेश देशमुख, जुगल भोंगाडे, उमेश ठाकरे, अंगराज समरित, बालु चुन्ने, डॉ. विकास गभने, धनु व्यास, प्रभात गुप्ता, चरणदास बावनकर, राजु सलाम पटेल, राहुल निर्वाण, सुनिल शहारे, आरजु मेश्राम, हितेश सेलोकर, महेंद्र गडकरी, गणेश बानेवार, शेखर गभने, महेंद्र बारापात्रे, महेश जगनाडे, लोकेश नगरे, गणेश चौधरी, विवेकानंद कुर्झेकर, दयानंद नखाते, श्रीधर हटवार, नितेश खेत्रे, दिपक चिमनकर, रुपेश खवास, सौ. मंजुषा बुरडे, राजेश मेश्राम, सौ. ज्योती खवास, सौ. निलीमा गाढवे, सौ. ज्योती टेंभुर्णे, सौ. शुभांगी खोब्रागडे, सौ. सरोज भुरे, सौ. पमा ठाकुर, सौ. निता हलमारे, सौ. मनोरथा जांभुळे, सौ. शोभणा गौरशेट्टीवार, डॉ. पोर्णिमा वाहाने, बंटी बांगडकर, सुमेध शामकुंवर, चेतक डोंगरे, किरण वाघमारे, चंद्रकांत कोहाड व फार मोठया संख्येने भंडारा व साकोली विधानसभा क्षेत्राचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ता व महिला उपस्थित होत्या.

blank