33.7 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home शैक्षणिक धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु

धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु

0
51

blank

गोंदिया,दि.05ः राज्य शासन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरच्या मार्गदर्शनात स्थानिय धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात उड्डाण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केद्र सुरु करण्यात आले आहे.यांतर्गत 28 व 29 जानेवारीला नागरी सेवा परीक्षा(आयएएस/आयपीएस0,बँकीग,आरआरबी,कर्मचारी निवड परीक्षा अशा विविध स्पर्धात्मक परीक्षेची माहिती महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळावी याकरीता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.शिबिराचे उदघाटन प्रसंगी प्राचार्य डाॅ.अंजन नायडू यांनी विद्यार्थ्यांना समर्पण व वचनबध्दता असल्यास नागरीसेवा परीक्षासारख्या कुठल्याही स्पर्धात्मक परीक्षेत यशस्वी होण्यापासून रोखू शकत नसल्याचे विचार व्यक्त केले.त्याकरीता मोठी स्वप्न बघितले पाहिजे सोबतच यश मिळविण्यासाठी परिश्रम घेण्याची तयारी हवी असेही ते म्हणाले.यावेळी प्रा.दिलीप चौधरी म्हणाले की अशा परिक्षेची तयारी जे विद्यार्थी करतात त्यांना प्रशिक्षणाची आवश्यकता असून त्यासाठीच महाविद्यालयात हे केंद्र सुरु करण्यात आले आहे.एडुक्लचर इंडियाचे संचालक अनुज सिंग,यांनीही परीक्षेसंदर्भातील टिपणी देत,मुलांना अशा परीक्षासांठी कशापध्दतीने तयार करावे याविषयी शंका असते त्यावर मार्गदर्शन केले.सामान्य ज्ञान व चालू घडामोडीचा अभ्यास यासाठी महत्वाचा असतो,त्याकरीता दररोजचे वृत्तपत्र वाचणे अनिवार्य असल्याचे म्हणाले.यावेळी पवनसिंग यादव यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वय प्रा.धर्मशील चव्हाण यांनी केंद्राची भूमिका,उदिष्ठे व भविष्यातील नियोजनाची माहिती दिली.सदर मार्गदर्शन शिबिर झूम मिटींगच्या माध्यमातून घेण्यात आले,यात 1060 विद्यार्थी सहभागी झाले होते.यशस्वीतेसाठी प्रा.एस.पी.तिमांडे,डाॅ.डी.एस.चौधरी,कार्यक्रम समन्वयक प्रा.धर्मवीर चौव्हान,कु.रुबींना कुरेशी व सर्व कर्मचारी सहकारी यांनी सहकार्य केले.

blank