मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मोबाईल मध्ये टिपले लोणार सरोवर….

0
56

बुलडाणा, दि.५ -राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आज सकाळी साडेनऊ वा.लोणार येथे हेलिकॉप्टरने आगमन झाले.येथील बाजार समिती समोरच्या मैदानावरील हेलिपॅडवर त्यांचे स्वागत करण्यात आले.यावेऴी उद्धव ठाकरे यांचेतील छायाचित्र कार आणि सरोवर प्रेम पुन्हा एकदा आज समोर आले.लोणार सरोवर येथे स्वतः मोबाईल मध्ये त्यांनी फोटो घेतले.अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
यावेळी बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्री ठाकरे यांचे स्वागत केले. जिल्हा परिषद अध्यक्ष मनिषाताई पवार, खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमूलकर,आ.संजय गायकवाड, लोणार नगराध्यक्ष पूनम पाटोळे, विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी एस.राममूर्ती, विशेष पोलीस महानिरीक्षक मिना, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया तसेच विविध राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित होते.