31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home राजकीय देवरी येथील मतदार यादीत बोगस मतदारांचा भरणा-शिवसेनेचा आरोप

देवरी येथील मतदार यादीत बोगस मतदारांचा भरणा-शिवसेनेचा आरोप

0
70

blank

देवरी,दि.06 : येत्या काळात नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेची निवडणुक होणार आहे. भावी उमेदवारांनी निवडणुकीत बाजी मारण्यासाठी नविनच शक्कल लावली असून आपल्या हित व नातेसंबधातील मतदारांची नावे त्यांच्या त्यांच्या पसंतीच्या प्रभागातील यादीत समाविष्ट केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिवसेनेच्या वतीने निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
देवरी येथील १५ जानेवारी रोजी प्रकाशित झालेल्या समाविष्ट मतदार यादीमध्ये मोठा घोळ असून बोगस मतदारांचा समावेश झाल्याचे निदर्शनास आले आहे. यादीत इतर गावातील मतदारांचे नाव देवरी येथील वेगवेगळ्या प्रभागात समाविष्ट करण्यात आले आहे. एकाच व्यक्तीला दोन ठिकाणी कसे मतदान करता येणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे काही मतदारांनी मागील महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान केले आहे. अशांची नावे देवरी येथील प्रभाग यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. सदर मतदार यादीवर तालुका शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. नगर पंचायतीच्या निवडणुकीत अपेक्षित उमेदवाराला फायदा पोहचवण्यासाठी संबंधित प्रभागात नाव यावे म्हणून बहुतांश मतदारांनी जाणीव पूर्वक त्यांची नावे समाविष्ट केल्याचे निवेदनात नमूद केले आहे. देवरीतील समाविष्ट मतदार यादीमध्ये जवळपास पाचशेच्या वर बोगस मतदारांची नावे समाविष्ट झाल्याची शक्यता शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली असून यादीतील बोगस मतदारांची नावे वगळण्यात यावे, सदोष मतदार यादी प्रसिद्ध करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देतेवेळी देवरी तालुका प्रमुख सुनील मिर्शा, शहर प्रमुख राजा भाटिया, विधानसभा संघटक राजीक खान, अनिल कुर्वे, सुभाष दुबे, डॉ. भुपेश पटले, परवेज पठाण, महेश फुन्ने यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

blank