
गोंदिया/भंडारा दि.13:- गोंदिया/ भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील सर्व नागरीकांना कळविण्यात येते की, जिल्हा परिषद व भंडारा पंचायत समितीची आगामी काळात सार्वत्रिक निवडणूक होणार असल्यामुळे राज्य निवडणूक आयोग यांचे कडून प्राप्त झालेल्या मतदार यादी तयार करण्याचे कार्यक्रमानुसार 15 जानेवारी 2021 रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरुन भंडारा व गोंदिया जिल्ह्यात येत असलेल्या निवडणूक विभाग व निर्वाचक गणाची प्रारुप मतदार यादी तयार करण्यात आलेली आहे. ही यादी 11 फेब्रुवारी 2021 रोजी जाहीर सुचनेव्दारे प्रसिध्द करण्यात येत असून तहसिल कार्यालय, येथे पाहणीसाठी व निरीक्षणासाठी उपलब्ध आहे.
प्रारुप मतदार यादीसंदर्भात नागरीकांच्या काही हरकती व सुचना असल्यास 22 फेब्रुवारी 2021 पर्यंत या कार्यालयात कार्यालयीन वेळेत लेखी स्वरुपात सादर कराव्यात. या दिनांकानंतर प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांचा विचार करण्यात येणार नाही त्यानंतर अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी अधिप्रमाणीत करुन अशी यादी 3 मार्च 2021 रोजी प्रसिध्द करण्यात येईल. असे प्राधिकृत अधिकारी तथा निवडणूक अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.




