
गोंदिया : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षीप्रमाणे यंदाही साजरी व्हावी म्हणून सर्वसामान्य जनतेने तैयारी केलेली आहे. त्यातच आता आघाड़ी सरकारने परिपत्रक काढून शिवजयंतीकरिता अनेक निर्बंध लावले. त्यामुळे शिवभक्तांचा छळ झाला असून,15 फेब्रुवारी रोजी भारतीय जनता युवा मोर्चा गोंदिया जिल्ह्याच्या वतीने नायब तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देण्यात आले.
भाजयुमोचे जिल्हा अध्यक्ष ओम कटरे यांच्या नेतृत्वात संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी तसेच सर्व तालुका अध्यक्ष व तालुका कार्यकारिणी सदस्यांच्या उपस्थितीत नायब तहसीलदार सरोदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांच्या नावे निवेदन देउन जाब विचारण्यात आले आहे. तसेच लावलेले निर्बंध तातडीने हटवून शिवजयंती जल्लोसात साजरी करु द्यावी अन्यथा संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन होईल, अशा इशारा देण्यात आला आहे.
याप्रसंगी भाजपा संगठन महामंत्री संजू कुलकर्णी, युवती संयोजिका हरमीत कौर, गुड्डू चांदवानी, गोंदिया अध्यक्ष तीजेश गौतम, शहर अध्यक्ष पलाश लालवानी, तालुका अध्यक्ष इंद्रजीत भाटिया, विनोद पटले, रहांगडाले, युवा मोर्चा महामंत्री पुरु ठाकरे, शिशुपाल राहंगडाले, देवराम चुटे, दिलेश सोनटक्के, प्रेमकृष्ण बेलवंशी, युवा पदाधिकारी माजिद खान, राजेन्द्र भगत, लेखराज बावनकुळे, टीनू टेंभरे, गोल्डी गावंडे, अनिल टेंभरे, इमरान खान, पंकज कोटंगले, पंकज टेंभरे, अभिषेक श्रीवास्तव, ललित बिसेन, विजय रहांगडाले, संतोष हनवते, राजेन्द्र भगत, प्रदीप रहांगडाले, कमलेश पाचे, पृथ्वीराज दसरे, लंकेश पटले, विन्नी गुलाटी आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





