33.9 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home राजकीय 18-फेब्रु. रोजी काँग्रेसची भव्य पदयात्रा

18-फेब्रु. रोजी काँग्रेसची भव्य पदयात्रा

0
113

blank

गोंदिया: केंद्र शासनाने शेतकरी व शेती विषयक पारित केलेले तीन कायदे रद्द करण्यासाठी देशातील शेतकरी मोठया प्रमाणपत्र दिल्लीच्या शिमेवार आंदोलन करीत आहेत.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिलेली आहे या क्षणी सुद्धा शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. तीनही कृषी कायदे शेती व शेतकरी विरोधी असुन मुठभरी पुंजीपतींच्या हिताचे आहेत. म्हणून हे तीनही काळे कायदे रद्द करण्यांत यावे या शेतकऱ्यांच्या मागणीच्या व शेतकऱ्यांनी चालविलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ गोंदिया जिल्हा काँग्रेस कमेटीने भव्य पदयात्रेचे आयोजन दि.18 फेबु. रोज गुरुवारला केलेले आहे.
सदर पदयात्रा कृषी उत्पन्न बाजार समिती गोरेगांव येथून सकाळी 9.00 वाजता सुरु होणार असुन ती गोरेगांव-हिरडामाली-तुमखेडा-कारंजा-फुलचूर ते गोंदिया अशी- राहणार आहे. पदयात्रेचा समारोप दुपारी 3.00 वाजता उपविभागीय अधिकारी, गोंदिया यांना निवेदन देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ होणार आहे.
या यात्रेदरम्यान तीनही काळे कृषी कायदे केंद्र सरकारनी रद्द करावे. तसेच भरमसाठ वाढलेले डीजेल, पेट्रोल, व स्वयंपाकाच्या गॅस चे दर कमी करावे याची मागणी करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त पदाधिकारी व कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी या पदयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन गोंदिया जिल्हा काँग्रेस कमेटीचे जिल्हा जिल्हाध्यक्ष डॉ. एन. डी. किरसान यांनी केले आहे.

blank