40.1 C
Gondiā
Wednesday, June 17, 2026
Home राजकीय शेतकरी कायद्याच्या विरोधात काँग्रेसने काढली पदयात्रा

शेतकरी कायद्याच्या विरोधात काँग्रेसने काढली पदयात्रा

0
191
गोरेगांव – केंद्र शासनाने शेतकरी व शेती विषयक पारित केलेले तीन कायदे रद्द करण्यासाठी देशातील शेतकरी मोठया प्रमाणपत्र दिल्लीच्या सीमेवार आंदोलन करीत आहेत.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिलेली आहे. या क्षणी सुद्धा शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. तीनही कृषी कायदे शेती व शेतकरी विरोधी असुन मुठभर पुंजीपतींच्या हिताचे आहेत. म्हणून हे तीनही काळे कायदे रद्द करण्यांत यावे या शेतकऱ्यांच्या मागणीच्या व शेतकऱ्यांनी चालविलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ गोंदिया जिल्हा काँग्रेस कमेटीने आज गुरुवारला(दि.18) गोरेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातून पदयात्रेला सुरवात केली.ही  पदयात्रा कृषी उत्पन्न बाजार समिती गोरेगांव येथून हिरडामाली-तुमखेडा-कारंजा-फुलचूर ते गोंदिया येथे पोचणार आहे. पदयात्रेमध्ये जिल्हाध्यक्ष डाॅ.एन.डी.किरसान,आमदार सहसराम कोरेटे,जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष व माजी सभापती पी.जी.कटरे,गोरेगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष डेमेंद्र रहागंडाले,ओबीसी जिल्हा आघाडी अध्यक्ष जितेंद्र कटरे,रत्नदीप दहिवले,अशोक(गप्पू)गुप्ता,योगेश(बापू)अग्रवाल,पप्पू पटले,माजी सभापती राजेश नंदागवळी,बाजार समिती संचालक आशिष नागपूरे,महेश चौधरी,परवेज बेग,राहुल कटरे,गुड्डू बोपचे,जहीर अहमद,ममता पाऊलझगडे,राजू काळे,वंदना काळे आदी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्यने सहभागी झाले होते