35.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home Featured News वडिलांच्या तेरवीवर खर्च न करता गावकर्‍यांसाठी केली पाण्याची सोय

वडिलांच्या तेरवीवर खर्च न करता गावकर्‍यांसाठी केली पाण्याची सोय

0
93

blank

कुरखेडा–गुरूदेव सेवा मंडळाचे सच्चे कार्यकर्ते दुधराम दखणे महाराज यांच्या निधनानंतर तेरवीसाठी अनावश्य खर्च न करता त्यांचे सुपूत्र रूपचंद दखणे यांनी गावातील सार्वजनिक विहिरीवर मोटारपंप बसवून नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले. त्यांच्या या कार्याचे कौतुक सर्वत्र केल्या जात आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व निष्काम कर्मयोगी तुकाराम दादा गीताचार्य यांच्या विचाराने प्रेरित होऊन ग्रामसभेच्या माध्यमातून गाव गणराज्य घाटी जंगल क्रांती सत्याग्रहाचे सर्मपित सोनानी, श्री गुरूदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते दुधराम दखणे महाराज यांचे मागील सप्ताहात निधन झाले. त्यांच्या कार्याची स्मृती कायम राहावी व त्यांच्या पश्‍चात इतर खर्च न करता इतारांना प्रेरणा देण्याचे कार्य अविरत सुरू राहावे यासाठी त्यांचे सुपूत्र रूपचंद दखणे यांनी स्वत:च्या गावात सामूहिक विहिरीवर पाण्यासाठी मोटारपंप बसून गावकर्‍यांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिली.
या उपक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी श्री गुरूदेव आत्मानुसंधाने भू-वैकुठ अड्याळ टेकडीचे प्रमुख मार्गदर्शक नामदेव ठाकूर, सार्वभौम ग्रामसभा समन्वय समिती संघटक प्रा. मिलींद सुपले, सहसंघटक भगवान प्रधान, सहसचिव रवी पवार व यवतमाळचे राज रामराव घुमनर, गावगणराज्य घाटीचे सरपंच हिरराम कोटनाके, पो.पा. सुरेश टेकाम, तंमुस अध्यक्ष देवराव ठलाल, नरेश लाडे, नत्थु दखणे उपस्थित होते.
मान्यवरांनी रूपचंद दखणे यांच्या कार्याचे कौतुक करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार समाजातील तळागाळापर्यंत पोहचविण्याची गरज असल्याचे सांगितले. याप्रसंगी दखणे परिवार व गावातील नागरीक उपस्थित होते.

blank