34.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ लाखनीत शिवजन्मोत्सव सोहळयाच्या शुभपर्वावर पुरस्कार वितरण सोहळा

लाखनीत शिवजन्मोत्सव सोहळयाच्या शुभपर्वावर पुरस्कार वितरण सोहळा

0
42

blank

◆ स्वप्नपुर्ती फाउंडेशनचा उपक्रम

◆ यंदाचे मोती सन्मान मानकरी डॉ. अतुल दोनोडे

लाखनी:विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वास स्वप्नपूर्ती फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी मानाचा “मोती सन्मान” दिला जातो. यावर्षी मोती सन्मान डॉ. अतुल दोनोडे यांना त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी देण्यात आला. या पुरस्कारांची घोषणा स्वप्नपूर्ती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत वाघाये यांनी केली. श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती व स्वप्नपूर्ती फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या समारोपीय कार्यक्रमाच्या प्रसंगी मोती सन्मान पुरस्कार आणि विविध स्पर्धांमधील पारितोषिक विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार चेतन भैरम होते. त्यांच्यासह मंचावर बालवक्ता अवंती सिंगनजुडे, प्रमुख अतिथी म्हणून डॉ. चंद्रकांत निंबार्ते, समितीचे अध्यक्ष संजय वनवे, मार्गदर्शक बाबुराव निखाडे, प्रवीण शेलार, स्वप्नपुर्ती फाउंडेशनचे सल्लागार अतुल भांडारकर, किशोर वाघाये, सचिव सुधीर काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

दरवर्षी स्वप्नपूर्ती फाउंडेशनच्या वतीने शिवजयंती निमित्त विद्यार्थ्यांच्या व युवकांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या विविध स्पर्धा घेण्यात येतात. यावर्षी वक्तृत्व स्पर्धा आणि शिवगीतगायन या २ स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक श्री. अमोल तांबे साहेब प्रामुख्याने स्पर्धकांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. स्पर्धा ही स्पर्धा असतेच मात्र त्याहीपेक्षा आपल्याकडे असलेल्या कलागुणांना त्या माध्यमातून एक मंच प्राप्त होत असतो आणि प्रयत्नांतून माणूस हा अधिक चांगलं शिकत असतो त्यामुळे स्पर्धा जिंकण्यापेक्षा मी सर्वोत्तम सादरीकरण करू शकेल या दृष्टीने आपण प्रयत्न करावे, आपण नक्की यशस्वी व्हाल अशा प्रेरणादायी शुभेच्छा पोलीस उपनिरीक्षक श्री. अमोल तांबे साहेब यांनी स्पर्धकांना दिल्या.

स्वप्नपुर्ती फाउंडेशनच्या वतीने आयोजित विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण देखील याप्रसंगी करण्यात आले. यामध्ये वकृत्व स्पर्धेमध्ये इशिका राऊत, भीष्मा लांडगे, रजत झलके, योग भुरे अशा चौघांना अनुक्रमे २००१ रु. आणि स्मृतीचिन्ह, १५०१ रु. आणि स्मृतीचिन्ह, १००१ रु. आणि स्मृतीचिन्ह, ५०१ रु. आणि स्मृतीचिन्ह असे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि प्रोत्साहनपर पारितोषिक प्रदान करण्यात आले. तर शिवगीत गायन स्पर्धेमध्ये अवंती सिंगनजुडे, सुनिता गीदमारे, कृष्णा सिंगनजुडे यांना अनुक्रमे २००१ रु. आणि स्मृतीचिन्ह, १५०१ रु. आणि स्मृतीचिन्ह, १००१ रु. आणि स्मृतीचिन्ह असे प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक प्रदान करण्यात आले.

श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने बालवक्ता कु. अवंती सिंगनजुडे यांना तसेच युट्यूबर अर्णव सिंगनजुडे यांना विशेष पारीतोषिक देऊन सन्मान करण्यात आला.

पुरस्कारांच्या नियोजनासाठी आणि वितरणासाठी स्वप्नपूर्ती फाऊंडेशनचे सचिव सुधीर काळे तथा पदाधिकारी प्राची बेदरकर, आशिष राऊत, नितेश टिचकुले, जय राठोड, बाळासाहेब चव्हाण, विशाल हटवार, सचिन अंबादे, याह्या आकबानी, आशीष बड़गे, माया बोरकर, अतुल नागपुरे, मोहन निर्वाण, आकाश भैसारे यांचे सहकार्य लाभले.

विद्यमान परिस्थिती पाहता दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा होणारा हा उत्सव अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आणि प्राप्त परिस्थितीच्या सर्व नियमांचे पालन करत संपन्न झाला.

blank