
भंडारा -: भारतीय महिला फेडरेशन व प्रगतिशील लेखक संघाच्यावतीने 8 मार्च 2021 ला दु. 2 वाजता राणा भवन भंडारा येथे जागतिक महिला दिन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.या प्रसंगी महिलांच्या विविध प्रश्नवर प्रलेसचे सचिव प्रा. रेणुकादास उबाळे, सामाजिक कार्यकर्त्या व भंडारा महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा श्रीमती दुर्गा ताई डोरले यांचे मार्गदर्शन होईल.
तसेच प्रसिद्ध लेखिका व महिला कार्यकर्त्या प्रियकला मेश्राम (भिक्षुणी) लिखित भारतीय महिला फेडरेशनच्या तडफदार नेत्या कॉम्रेड शांताबाई बावनकर यांचे जीवन चरित्र “वाळवंटातील पाऊलवाट” या पुस्तकाचे विमोचन करण्यात येईल.
सर्व स्तरातील महिलांनी तसेच प्रलेसचे सदस्य व नागरिकांनी कोविड-19 च्या अटींचे पालन करीत उपस्थित राहावे असे आवाहन महिला फेडरेशन व प्रलेस च्या वतीने सीमा फुले ,ममता तुरकर व कॉ.हिवराज उके यांनी केले आहे.




