
गोंदिया,दि.07ः वर्षानुवर्षे भीक मागून तर कधी कबाळी वेचून उदरनिर्वाह करणाऱ्या मांगारूडी समाजाच्या वस्तीत मराठा सेवा संघाचे अध्यक्ष इंजि.सुनील तरोणे यांनी शिलाई मशीन भीक मागणाऱ्याच्या हातात देऊन उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करण्यास पुढाकार घेतला.
महिला दिवसाच्या पूर्वसंध्येच्या औचित्याने भीक मागणाऱ्या हातात रोजगाराचे एक साधन आलं. काही मुलींचे शिलाई प्रशिक्षण झालेले असताना त्यांच्या स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी इंजी.सुनील तरोणे याचे हे सकारात्मक पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे.यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या सविता बेदरकर, महिला अर्बन बँकेच्या अध्यक्ष प्रा. डॉ.माधुरी नासरे, डाॅ.छाया लंजे,शारदा सोनकनवरे, वर्षा भांडारकर, महिला बँकेच्या सौ.निनावे, सौ. गाळे, राज जांभूळकर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सविता बेदरकर यांनी केले कार्यक्रमाला मार्गदर्शन डॉ.माधुरी नासरे यांनी केले तर आभार दिव्या भगत यांनी मानले.





