
गोंदिया/रावणवाडी,दि.08ः– भारत राखीव बटालियन २, राज्य राखीव पुलिस बल गट क्रमांक 15 बिर्सी कॅम्प गोंदिया येथे 6 मार्च रोजी 73 वा वर्धापन दिवस सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून समादेशक जावेद अन्वर उपस्थित होते.वर्धापन दिन निमित्त हर्ष फायर परेड घेण्यात आली.परेडचे आयोजनासाठी प्रभारी समादेशक सहाय्यक विनोद कुमार राय यांनी विशेष परिश्रम घेतले. परेडचे संचलन पोलीस उपनिरीक्षक जे. के .राय यांनी केले. परेड मध्ये कंपनी क्रमांक १ चे नेतृत्व पोलीस उप निरीक्षक शेडमाके, कंपनी क्रमांक २ चे नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक चौधरी यांनी केले. त्याचप्रमाणे निशान टोळीचे नेतृत्व पोलिस उपनिरीक्षक धुडसे यांनी केले.परेड संचालना नंतर विशेष कामगीरी करणारे पोलीस अधिकारी /अमलदार यांना समादेशक यांच्या हस्ते पुरस्कार व प्रमाणपत्र वितरण करण्यात आला.यावेळी पोलीस निरीक्षक के .बी सिंह,पोलीस निरीक्षक एच.आर.सिंह, पोलीस निरीक्षक एस.जी.हिरपुरकर व इतर पोलीस अधिकारी /अमलंदार हजर होते.सूत्र संचालन पोलीस कल्याण अधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.हर्ष परेड नंतर गट रुग्णालयात डॉ.कोकूर्डै यांचे नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी / अमलदार व त्यांचे कुटुंबीय यांचे करिता वैद्यकीय शिबिर घेण्यात आले.रोगनिदान शिबिरात स्त्री रोगतज्ञ डॉ.स्मिता वैद्य,डॉ.पांडे सहभागी झाले होते.